चाळीसगाव (प्रतिनिधी) : येथील बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयात इंग्रजी विभाग आणि आई.क्यू.ए. सी., ट्रेनिंग अँड प्लेसमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर ओपोरचुनीटीज इन् इंग्लिश या विषयावर एक दिवसीय महाविद्यालय स्तरीय व्याख्यान दि.22.12.2020 रोजी आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रा.पी.आर.पाटील यांनी व्याख्यानाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय उद्घाटन महाविद्यालाचे प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी केले. त्यांनी अध्यक्षीय भाषणात इंग्रजी विषय आणि त्याचे रोजगाराचे महत्व विषद केले. विद्यार्थ्यांनी त्याच त्या पारंपारिक वाटा न निवडता काळानुरूप पुढील शिक्षण घेऊन रोजगार प्राप्त करावा आणि यात महाविद्यालय सदैव विद्यार्थ्यांसाठी तत्पर असेल असे प्रतिपादन केले. आई.क्यू.ए.सी. कोऑर्डीनेटर तथा उप- प्राचार्य प्रा.अजय काटे यांनी अश्या व्याख्याना मुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील असे सांगितले.
या व्याख्यानाला लाभलेले वक्ते प्रा.विजय शिरसाट, एन. वाय. एन.सी. कॉलेज चाळीसगाव यांनी पदवी आणि पदव्युत्तर झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या आणि पुढील बदलत्या शिक्षणाच्या वाटा सांगितल्या.यात विविध नवीन आणि रोजगाराभिमुख कोर्सेस ची माहिती विस्तृत पणे विषद करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांचे विविध शंकांचे निरसन करून घेतले . सदर कार्यक्रमात एकूण 78 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर व्याख्यान हे झूम डिजिटल प्लाटफोर्म वर घेण्यात आले. समन्वयक प्रा.रविंद्र बोरसे यांनी सूत्र संचालन केले तर प्रा.सलमान पठाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी डॉ. राहुल कुलकर्णी चे विशेष सहकार्य लाभले.

