चाळीसगाव : मंगेश चव्हाणांनी भाजपाचा गड राखला

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव देशमुख यांच्यावर केली मात,

चाळीसगाव :-चाळीसगाव विधानसभेची निवडणूक सुरुवातीला भारतीय जनता पार्टीला सोपी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या क्षणी अटीतटीची लढत होऊन, त्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजीव देशमुख यांचा 4242 मतांनी पराभव केला.

चाळीसगाव येथील राष्ट्रीय महाविद्यालयाच्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरू असलेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून तर पाचवी फेरीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव देशमुख  आघाडीवर होते त्यानंतर साहव्या फेरीपासून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी साहव्या फेरीपासून राजीव देशमुख यांच्यावर आघाडी घेत आपली आघाडी 25 व्या फेरी अखेर कायम ठेवत शेवटी ४२४२ मतांनी मात करत विजयश्री खेचून आणली,

चाळीसगाव शहराची राष्ट्रवादीस साथ

चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात 6 ,7 ,8 ,9 10 ,11 ,12 ,13 ,14 ,15 व्या फेरीअखेर आघाडीवर असलेले भाजपाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांची 6437 मतांवर असलेली आघाडी शहरात मतमोजणी सुरू होताच मंगेश चव्हाण यांचा मताधिक्य कमी होऊन 1971 वर येऊन पोहोचले होते. परंतु शहराचे मतदान संपल्यानंतर ग्रामीण भागाची ची मतमोजणी पुन्हा सुरू होताच मंगेश चव्हाण यांच्या मतदानाचा लीड वाढतच गेला.

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात शेवटच्या अंतिम फेरीत उमेदवारांना मिळालेली मते

१) ओंकार केदार (बी एस पी ) १२९८

२) राजीव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस )८०९६९

३) मंगेश चव्हाण (भा ज पा )८५०६९

४) राकेश जाधव (मनसे )१३९३

५)मोरसिंग राठोड (वंचित आघाडी )३८३६०

६) उमेश करपे (अपक्ष )७७९

७) विनोद सोनवणे (अपक्ष )१००२

८) डॉ.विनोद कोतकर (अपक्ष )४५२२

Leave A Reply

Your email address will not be published.