चाळीसगाव पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला पाच ठिकाणी मोठे लिकेज

0

शहराचा पाणीपुरवठा होणार पाच दिवस विस्कळीत होणार

पाणी जपून वापरण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन

चाळीसगाव :- नगरपरिषदेने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी  गिरणा धरणावरून आणलेल्या मुख्य जलवाहिनीला  आज एकाच वेळी पाच ठिकाणी मोठे लिकेज झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पुढील पाच दिवस विस्कळीत होणार असून पालिकेच्या वतीने दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असले तरी नागरिकांनी आपल्या कडील पाणी साठा जपून वापरावा असे आवाहन पालिकेचे नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी जनशक्ति शी बोलताना व्यक्त केली आहे.

पाच ठिकाणी लिकेज

गिरणा धरण ते डेराबर्डी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनीला बेलगंगा जवळ एका ठिकाणी  तसेच बायपास जवळ धोत्रे यांच्या हॉटेल जवळ तीन ठिकाणी  तर संगम हॉटेल च्या पुढे  एक असे पाच लिकेज एकाच वेळी पडल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे या घटनेने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होणार असून पालिकेचे  पाणीपुरवठा मुख्य अभियंता संजय अहिरे, दिपक देशमुख  तसेच जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या आय एच पी कंपनीचे  इंजिनियर व तज्ञांनी दुपारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे लिकेज च्या अनुषंगाने ह्या दुरुस्त्या करण्यासाठी चार ते पाच दिवसाचा अवधी लागणार असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळित होणार असल्याची पालिका सूत्रांनी कळविले आहे पावसाची दिवस असल्याने लिकेज दुरुस्तीला एक-दोन दिवस अधिक लागण्याची शक्यता गृहीत धरून शहरवासीयांनी आपल्याकडील असलेला पाणीसाठा जपून वापरावा व पालिकेला सहकार्य करावे असे आव्हान लोकनियुक्त नगराध्यक्ष आशालता चव्हाण यांनी जनशक्ती शी बोलताना केले आहे तसेच या दुरूस्तीला साधारण तीन ते चार दिवस लागणार असून युद्धपातळीवर हे पाचही लिकेज दुरुस्त करण्यात येणार आहे असे असताना शहरवासीयांनी पालिकेला सहकार्य करावे अशी अपेक्षा पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.