चाळीसगाव नगरपालिकेच्या उपाध्यक्षासह शहर विकास आघाडीचे नगरसेवकांचा मुख्याधिकार्‍यांना घेराव

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) : चाळीसगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब यांच्या दालनात आज सकाळी साडेअकरा वाजता चाळीसगाव नगरपालिकेच्या उपाध्यक्षा सौ आशाताई रमेश चव्हाण यांच्यासह अपक्ष नगरसेविका सायली रोशन जाधव यांचे पती रोशन जाधव व शहर विकास आघाडीचे नगरसेवक तथा नगरपालिकेचे उपगट नेते सुरेश स्वार,  रामचंद्र जाधव,दीपक पाटील, शेखर देशमुख ,सूर्यकांत ठाकूर, सौ अलका सदाशिव गवळी, श्रीमती सविता सत्‍यवान राजपूत, मनिषा शाम देशमुख, योगिनी भूषण ब्राह्मणकर, जगदीश चौधरी, या नगरसेवकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री नेवाळे यांच्या दालनात नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी यांना घेराव घालून जाब विचारला की, चाळीसगाव नगरपालिकेचे सत्ताधारी गटाचे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी कालच पत्रकारांसमोर अपक्ष नगरसेवक व शहर विकास आघाडीचे नगरसेवक विकासाच्या कामाला अडथळे आणतात व विकास होऊ देत नाही? असं सांगितलं,यावर आम्ही आपणास कोणत्या कोणत्या विकासाच्या कामांना विरोध केला! याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे असे सांगितले.

शहर विकास आघाडीच्या कोणत्या? नगरसेवकांनी मलनिस्सारण प्रकल्पाचे काम बंद पाडले हे आधी सांगा ?या प्रश्नाचे उत्तर देताना चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ आशा लता चव्हाण यांची भंबेरी उडाली त्यांनी सांगितले की काम केव्हा सुरू झाले हे मलाच माहीत नव्हते !परंतु ठेकेदाराचा माणूस व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांचा फोन आल्यावर मला कळाले की मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामाचे खड्डे खोदले जात आहे आणि तेथे शहर विकास आघाडीचे नगरसेवक खड्डा खोदण्याचे काम बंद पाडत आहेत,

*कोट्यावधी रुपयाच्या योजनेच्या कामाची सुरुवात गुपचूप कशी नगरसेवकांचा सवाल*

चाळीसगाव नगरपालिकेत लाख रुपये कामाची सुरुवात मोठमोठे बॅनर लावून भूमिपूजन करून वाजत-गाजत केली जाते मंग एवढ्या कोट्यावधी रुपयांच्या कामाची सुरुवात गुपचूप कशी, शिवाय मलनिस्सारण प्रकल्पाच्या खड्डा खोदण्याचे काम चालू असताना, भुयारी गटारीचा उल्लेख कसा? असा प्रश्न शहर विकास आघाडीचे उपनेते सुरेश स्वार यांनी विचारला असता? नगराध्यक्ष सौ आशालता चव्हाण यांनी सांगितले की ह्या कामाची सुरुवात झाली हे मलाच माहीत नव्हते काम केव्हा चालू केले या उत्तराने नगर सेवकांमध्ये अधिकच गोंधळ निर्माण झाला, यावेळी नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केला की म्हणजे आजही नगरपालिकेत नगरपालिकेचे कामकाज त्रयस्थ व्यक्ती चालवते का? असा सवाल नगराध्यक्षांना उपस्थित केला

या वादातच शहर विकास आघाडीचे नगरसेवकांसह उपाध्यक्षा सौ आशाताई चव्हाण यांनी चाळीसगाव नगरपालिकेच्या दिनांक 22 /2/ 2021 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त पाहण्यासाठी प्रोसिडिंग बुकाची मागणी केली.  यावेळी मुख्याधिकारी व नगरसेवकांमध्ये खूपच गोंधळ निर्माण झाला शेवटी शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा पाहून मुख्याधिकारी नेवाळे यांनी प्रोसिडिंग मागविले व दिनांक 22/ 2 /2022 रोजीच्या सभेचे इतिवृत्त पाहण्यास ठेवले.

त्यावेळी शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या निदर्शनास आले की सर्वसाधारण सभेमधील १ते ४७ विषयांपैकी प्रोसिडिंग बुक मध्ये आज दिनांक २२/ 3/ २०/२१ पर्यंत विषय क्रमांक ४६ व ४७ या विषयाचे इतिवृत्त प्रोसिडिंग बुक मध्ये नोंदविण्यात आले नव्हते? त्यामुळे प्रोसिडिंग बुक हे कोरे ठेवण्यात आले असून आणि प्रोसिडिंग बुक अपूर्ण असल्याने त्या प्रोसिडिंग बुक वर मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा यांच्या सह्याच नव्हत्या, तर ते प्रोसिडिंग पाहिल्यानंतर लगेच शहर विकास आघाडीचे नगरसेवक सह उपनगराध्यक्षा सौ आशा ताई चव्हाण यांनी मुख्याधिकारी नेवाळे यांना लेखी पत्र दिले की, आज दिनांक २२/२/२०२१ पर्यंत, प्रोसिडिंग बुकात मलनिस्सारण प्रकल्पाचा विषय सर्वसाधारण सभेतील विषय पत्रिकेवर विषय क्रमांक ४६ व ४७ असतांना या  विषयाचे इतिवृत्त प्रोसिडिंग बुक का लिहिले नाही?

या जागेवर जनतेच्या हरकती असताना यावर आपण प्रोसिडिंग मध्ये काय निर्णय दिला? त्याचे आम्हास लेखी खुलासा द्यावा असे निवेदन दिल्यावर  मुख्याधिकारी नेवाळे यांनी सांगितले की, मी मान्य करतो की चाळीसगाव नगरपालिकेच्या प्रोसिडिंग बुकात सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक ४६ व ४७ या विषयाचे इतिवृत्त आज दिनांक २३/२/२०२१  पर्यंत लिहिले गेले नाही, तसा त्याबाबतचा खुला लेखी खुलासा मी आपणास देतो असे सांगितल्यावर शहर विकास आघाडीचे नगरसेवक थोडे शांत झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.