चाळीसगाव | प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड काेविड केअर सेंटरमध्ये काेराेना बाधितांवर उपचारासाठी १०० बेडची सुविधा करण्यात अाली अाहे. त्यातील ५० बेड अाॅक्सिजनचे तर ५ बेडला व्हेंटिलेटरची सुविधा अाहे. तर अंध शाळेतील कोविड केअर सेंटरमध्ये ५० बेडची सुविधा करण्यात आली आहे. शहरातील १० खाजगी रुग्णालयांनाही काेराेना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात अाली अाहे.
तालुक्यात सध्या कोरोनाचे ५४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ते येथील ग्रामीण रुग्णालयातील काेविड केअर सेंटरसह अंध शाळेतील कोविड केअर सेंटर व अन्य १० खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. दरम्यान कोविड सेंटरमध्ये प्रशासनाला वार्डबॉय, परिचारिका व स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता भासत अाहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढला आहे. वरिष्ठ प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची मागणी केली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.पी. बाविस्कर यांनी दिली. तालुक्यात अातापर्यंत ६००४ रुग्ण आढळून अाले असून त्यातील ५३७८ रुग्ण काेराेनातून मुक्त झाले अाहेत. ८६ रुग्णांचा बळी गेला अाहे.
