चाळीसगाव :– राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत चाळीसगाव तालुक्यायात अडीच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सामाजिक वनीकरण विभागासोबत तीन वर्षापासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, कृषी विभाग महसूल विभाग, शाळा, महाविद्यालये यासह विविध ठिकाणी उद्दिष्ट देऊन वृक्षारोपण करण्यात येते. जुलै-ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आल्यानंतर संबंधित विभागांकडून मात्र या रोपांकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. केवळ फोटोसेशन पुरतेच हे वृक्षारोपण दिसून येते. गतवर्षी अडीच लाख वृक्षांची लागवड योजना मोठ्या उत्साहात संपन्न झाली मात्र लागवड केलेली निम्म्याहून अधिक रोपे पाणी वेळेवस न मिळाल्याने जळून खाक झाली आहेत. एकीकडे गतवर्षी लावलेले रोपे जिवंत असल्याचे दिसून येत नाही तर दुसरीकडे आता पुन्हा पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षरोपण केले जाणार आहे.सामाजिक वनीकरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे गतवर्षी लागवड केलेल्या रोपे जळून गेल्याने तालुक्यात शासनाच्या या चांगल्या योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे.
वाढते औद्योगिकीकरण व शहरीकरण यामुळे वनसंपदा धोक्यात आली आहे. यंदा तर तीव्र दुष्काळाने कहर केला आहे. एकट्या चाळीसगाव तालु्नयात 40 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ही गंभीर स्थिती असतांना देखील तालुक्यात मात्र वृक्षतोडही सर्रास होत असल्यामुळे जमिनीवरील वृक्षांचे आच्छादन कमालीचे कमी झाले आहे. डेरेदार वृक्षांवर सर्रास घाव घातले जात असतांना देखील वन विभागाने त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याने तसेच रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर चालू असल्याने रस्त्यावर येणारी डेरेदार वृक्षाची कटाई होत आहे त्यामुळे तालूक्यायातील वन संपदा मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहे. परिणामी अनियमित पावसाळा होवून कधी नव्हे असे वाढीव तापमान या वर्षी अनुभवायला मिळत आहे. निसर्गाचा समतोल पुरता बिघडल्याने महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात येते.गेल्या वर्षीही जिल्ह्यात 42लाख 4 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. त्यात चाळीसगाव तालु्नयात अडीच लाख वृक्ष लागवड योजनेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तालुक्यायाला 2 लाख 55 114 रोपे लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते.त्यात तालु्नयातील प्रत्येक ग्रामपंचायतीला एक हजार 125 रोपे, सर्व शासकीय कार्यालये 42 हजार 427 रोपे, सामाजिक वनीकरण 54 हजार आणि पाटणादेवी वन्यजीव विभाग 37 हजार 187 असे वृक्षलागवडीचे उद्दीष्ट होते.
वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धन महत्वाचे असल्याने त्याबाबत लावलेल्या झाडांना पाणी देणे महत्वाचे होते.सुरुवातीला काही दिवस या लागवड केलेल्या रोपांना पाणी दिले. मात्र नंतर पावसाने तालु्नयात पाठ फिरवली तशी सामाजिक वनीकरणाने देखील या लावलेल्या रोपांकडे पाठ फिरवली. लागवड केलेल्या रोपे जगविण्यासाठी तालु्नयात लाखो रूपये खर्च केले. मात्र प्रत्यक्षात लागवड केलेले अडीच लाखापैकी किती रोपे जगली हा संशोधनाचा विषय असून बहुताश रोपे वेळेत पाणी न मिळाल्याने जळून गेली त्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला.आज शासनाचे सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी वृक्षसंवर्धन हिशोब देण्यास तोंड लपवत आहे त्यासाठी वृक्ष लागवड योजना ही शासनाची मोहीम न राहता ती लोकचळवळ राहावी अशी अपेक्षा व्यक्त होत होती ती फोल ठरली आहे. यंदा तीव्र दुष्काळाने जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. पाणी किती अमोल असते याचा अनुभव प्रत्येक नागरीकाला येत आहे. पाणी टंचाईची भिषण परिस्थिती असतांना देखील नागरीकांमध्ये वृक्ष लागवडीबाबत जागरुकता नसल्याचे चित्र आहे. शासनाची वृक्ष लागवड योजना अनास्थेची बळी ठरल्याने तालु्नयात जळून खाक झाली पण दुष्काळामुळे समाजमन संवेदनशील होण्याची अपेक्षा असतांना हा समाजदेखील अनास्था बाळगुन असल्याचे निराशाजनक चित्र तालु्नयात आहे.
सामाजिक वनीकरण विभागातर्फे तालु्नयात गतवर्षी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.त्यातील बहुताश रोपे जळून गेल्याने वृक्ष लागवड योजनेचा पुरता बोर्या वाजला आहे. दुष्काळाने कहर केला असतांना देखील समाजमन संवेदनशील होत नाही. वन विभागाच्या सोईस्कर दुर्लक्षामुळे कधीकाळी वृक्षराजीने बहरलेला हा तालुका पुरता बोडका होत चालला असून वृक्षांवर घाव पडत असतानां देखील वृक्षतोड चोरांवर कुठलीही कारवाई होत नाही. हे असेच सुरु राहीले तर तालु्नयाचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. झाडे जगवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे पण कोणताही विभाग वृक्षारोपणानंतर त्या रोपांकडे ढुंकूनही पहात नाही. त्यामुळे उन्हाळ्यात तर ही रोपे जळून खाक होतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी व विविध संस्थांचे वृक्षारोपण केवळ फोटोसेशन व वृत्तपत्रातील बातम्यांपुरते असल्याचे दिसून येते. आता पावसाळा सुरु झाला आहे. यंदाही पुन्हा शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा घाट घातला जाईल पुन्हा तेच तेच खड्डे व नवीन वृक्ष लागवड असा उपक्रम राबविला जाईल. प्रत्येकालाच तीव्र उन्हापासून बचाव करण्यासाठी झाड हवे आहे पण लावलेले रोपटे जतन करावे असे कुणाला वाटत नाही.