चाळीसगाव : चाळीसगाव शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, चाळीसगाव आरोग्य यंत्रणेकडून आज (ता.22) रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शासकीय लॅबकडुन आलेल्या अहवालानुसार 5 तर खाजगी लॅबकडील अहवालानुसार 24 असे एकूण एकाच दिवशी 29 नव्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 267 वर पोहचली आहे. तर तालुक्यात आतापर्यंत एकूण 21 जणांचा बळी घेतला आहे

आज बुधवारी तर कोरोनाचा विस्फोट झाला.आज स्वॅब घेतलेल्या 59 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात 54 जणांचा अहवाल निगेटीव्ह आले तर 5 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले.त्यात उंबरखेड व कळमडू येथील प्रत्यंकी एक तर चाळीसगाव शहरातील मोची गल्लीतील 3 असे पाच कोरोनाबाधित आढळून आले. तर खाजगी लॅब मध्ये घेतलेल्या 69 सॅम्पलपैकी तब्बल 24 जण पॉझिटीव्ह आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या बाधितांमध्ये दत्तवाडी, शिवाजी चौक, संताजी मंगल कार्यालय, नेताजी चौक, पाटीलवाडा, दूध सागर मार्ग, टाकळी, लक्ष्मीनगर, पिंपरखेड, तळेगाव व सानेगुरूजी नगर येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळला तर फुले कॉलनीत 3, सिंधी कॉलनीत 4, पवारवाडीत 2 व अफु गल्लीत 3 असे एकूण 24 रूग्ण आढळून आले आहेत.

