चाळीसगाव – राज्यातील वीज ग्राहक व शेती पंपधारकांच्या समस्यांसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने यापूर्वीच ‘टाळा ठोको हल्लाबोल’ आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देण्यात आला होता. मात्र तरीही शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांचे शेतीचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ चाळीसगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसिलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास भाजपातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, जिल्हा चिटणीस ऍड. प्रशांत पालवे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, सरचिटणीस गिरीष बराटे, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, नगरसेवक नितीन पाटील, चिरगोद्दीन शेख, भूषण पाटील, गोरखभाऊ चव्हाण, दिनकर राठोड, दीपक राजपूत, किशोर रणधीर, निवृत्ती कवडे, तुषार देसले, यश पालवे, मधुकर गोपाळ, प्रशांत मराठे, सागर मुंडे, राकेश पाटील, गणेश पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, विजबिलावरील इतर आकार व व्याज माफ करून थकलेले वीज बिल भरण्यासाठी सवलत देऊ असे आपल्याच वीजमंत्र्यांनी सांगितले होते.
वरील कोणतीही बाब लक्षात न घेता निम्मे वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्याकडे तगादा लावला जातोय.
कोणतीही पूर्व सूचना न देता संपूर्ण डीपी बंद करून नाहक शेतकऱ्याला त्रास दिला जातोय.
अशाच प्रकारे कोणतीही पूर्व सूचना न देता घरगुती वीज कनेक्शन तोडून सर्व विजग्राहकाना त्रास दिला जात आहे. ही सर्व शेतकऱ्यांची फसवेगिरी आहे. त्यांना जाणून बुजून त्रास देण्याऱ्या राज्यातील महाआघाडी सरकार विरुद्ध आम्ही शांतता मार्गाने शेतकऱ्यांना सोबत घेऊन निवेदन सादर करत आहोत.
या दिलेल्या निवेदनावर राज्यातील महाआघाडी सरकारने निर्णय न घेतल्यास,शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास, आगामी कालखंडात भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करेल व त्या आंदोलनाला राज्यातील हे शेतकरी विरोधी सरकार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
या सरकार मधील वीज मंत्र्याने शेतकऱ्यांचे वीजबिल 100% माफ करू अशी घोषणा केली होती पण ती पूर्ण केली नाही. त्यामुळे या शेतकरी विरोधी सरकारचा निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

