चाळीसगाव तालुक्यातील ग्रा.पं. निवडणुकीत भाजपाविरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार का?

0

चाळीसगाव (आर डी चौधरी) : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तब्बल सहा महिने पुढे ढकलण्यात आलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम  जाहीर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता खणखणाट  वाढणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधीत गावांमध्ये आचारसंहिता देखील लागू झाली आहे. १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींच्या नवीन कारभारी किंवा कारभारीन, निवडण्यासाठी मतदान होईल.तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होईल.चाळीसगाव तालु्क्यातील मुदत संपणाऱ्या ७६ ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. त्यामुळे या गावांमध्ये  ऐन थंडीत राजकीय वातावरण गरम होणार आहे. तालु्क्याचे विद्यमान आमदार, माजी आमदार यांच्या प्रतिष्ठेची कसोटी या निवडणूकीच्या निमीत्ताने लागणार आहे.

 

कोरोनामुळे ग्रामपंचायती निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी  दि.1 जानेवारी रोजी गावोगावी प्रसिद्ध करण्यात आली. २५ सप्टेंबर२०२० या तारखेची मतदार यादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.  या यादीवर १ ते ७डिसेंबर दरम्यान  कालावधीत हरकती मागवण्यात आल्या होत्या. तालु्क्यातून तब्बल ४१ गावांमधून ३८०हरकतींचा पाऊस पडला होता

 

.या हरकतीनुसार दुरूस्तीकरून मतदार याद्या अपडेट करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहेत.आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघणार हे.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुका स्तरावर राजकारणाचा ठसा उमटवू पाहणाऱ्या व गावात सत्ता परिवर्तनाची आस असलेल्या इच्छुकांच्या हालचाली आता गतीमान होणार आहेत.

 

कारभारी किंवा कारभारीन सरपंच पदाचे आरक्षण,२२डिंसेबरला

तालु्क्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे नुकतेच वार्ड रचना व आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर या ७६ ग्रामपंचायतींच्या एक द्वितीयांश सरपंच पदे ही महीलांसाठी(अनुसुचीत जाती महिला व अनुसुचीत जमाती महिला, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसह) सरपंच पदे आरक्षण निश्चीत करण्यासाठी उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली चाळीसगाव येथे २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे आरक्षण निश्चीत झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे.ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगूल वाजल्याने ऐन थंडीत ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

मुदत संपलेल्या ह्याच ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणूका

चाळीसगाव तालु्क्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती खालील प्रमाणे अशा-

कळमडू, भामरे बुद्रूक, चांभार्डी खुर्द, चांभार्डी बुद्रूक, हातले, जामडी प्र. बहाळ, रोकडे, वाघले, वाकडी, वाघडू, पिंप्री खुर्द, देवळी, शिंदी, बिलाखेड, अलवाडी, डोणदिगर, तळोंदे प्र.दे., खरजई, टाकळी प्र.चा., दसेगाव, रोहीणी, ओढरे, घोडेगाव, राजदेहरे, हातगाव, पिंपळगाव, तिरपोळे, वरखेडे बुद्रूक, पळासरे, वाघळी, मुंदखेडे खुर्द, मुंदखेडे  बुद्रूक, तामसवाडी, तळोंदे प्र.चा., कुंझर, पोहरे, भऊर, जामदा, भवाळी, खडकी बुद्रूक, कोदगाव, पाटणा, दस्केबर्डी, हिंगोणे खुर्द, खेडी खुर्द, नांदरे, मांदुर्णे, पिलखोड, सायगाव, देशमुखवाडी, पिंपळवाड निकुंभ, शिरसगाव, टाकळी प्र.दे., तमगव्हाण, टेकवाडे खुर्द, बहाळ, धामणगाव, गोरखपूर, चितेगाव, जुनोने, बोरखेडा बुद्रूक, रहिपुरी, वडगाव लांबे, तरवाडे, पिंप्री बुदूक प्र.दे., ब्राम्हणशेवगे, लोंढे, खडकीसीम, बेलदारवाडी, तांबोळे बुद्रक, भोरस बुद्रक, बाणगाव, रांजणगाव, बोढरे या ७६ गावांचा समावेश आहे.

या मातब्बरांच्या गावांचा समावेश

निवडणूका होवू शकणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये तालु्क्यातील मातब्बर राजकीय धुरीणांचे गाव आहे. त्यात तालु्नयाचे आमदार मंगेश चव्हाण यांचे हिंगोणे खुर्द, बाजार समितीचे माजी सभापती सरदारसिंग राजपूत यांचे जामदा गाव, भाजपाचे माजी ज्येष्ठ नेते आणि सध्या राष्ट्रवादीवासी झालेले कैलास सुर्यवंशी यांचे टाकळी प्र.दे., पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील यांचे भोरस बुद्रूक, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांचे भामरे बुद्रूक, पंचायत समितीच्या माजी सभापती स्मितल बोरसे यांचे बहाळ, माजी केंद्रीय मंत्री एम के पाटील यंाचे हातगाव आदी मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. तर पिलखोड, सायगाव, पाटणा, रांजणगाव, टाकळी प्र.चा. या मोठ्या गावांच्या निवडणुकांकडेही तालु्क्याचे लक्ष लागलेले आहे.

राज्याचे राजकारण वेगळ्या वळणारवर आहे.शिवसेना-कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी  महाविकास आघाडीआहे. नुकताच राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव जी ठाकरे यांनी सर्व स्थानिक पातळीवरील निवडणुका सुद्धा महाविकास आघाडी तर्फे लढवणार असल्याचे सूतोवात दिले असल्याने ग्रापंचायती निवडणूका ह्या महाविकास आघाडी तर्फे लढवली जातात किंवा सहसा गाव पातळीवरील निवडणुका ह्या राजकीय पक्षांच्या चिन्हावर सहसा लढवल्या जात नाही. मात्र आगामी राजकीय सुंदोपसुंदी लक्षात घेता ग्रामपंचायतींवर आपल्याच पक्षाची सत्ता यावी यासाठी भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेस यांचे प्रयत्न होतील.अलीकडेच भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.तालु्क्यातही त्याचे धक्के जाणवले.त्याचा तालु्क्यात आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणूकीत काय परिणाम घडवतात याकडेही तालु्क्याचे लक्ष आहे.या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.