चाळीसगाव :-चाळीसगाव तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आज सकाळी दहा वाजता चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांना महाराष्ट्र शासनाच्या कारभाराबाबत व केंद्र शासनाने अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल यावर लावलेला अस्मानी कर याच्या निषेधार्थ निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
या दिलेल्या निवेदनात मालाड मुंबई येथे भ्रष्टाचारामुळे पडलेल्या भिंतीत नाहक २७ जणांना आपला जीव गमवावा लागला ,तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याने एकोणवीस जणांचा मृत्यू होऊन चार जण अजूनही बेपत्ता आहे या घटनेचा राज्य सरकारच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य केल्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पीककर्ज वाटपाबाबत बँकांकडून सुरू असलेली अडवणूक व राज्य सरकारची उदासीनता याचाही निषेध करण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
चाळीसगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र पाटील रमेश शिंपी एडवोकेट वाडीलाल चव्हाण अल्ताफ खान समशेर खान ,काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, रामदेव चव्हाण, माजी आमदार ईश्वर जाधव ,अशोक खलाने, सुधाकर कुमावत, लुकमानबेग नबीबेग, शेख समीर शब्बीर शेख, मंगेश अग्रवाल, शोभाताई पवार, जगन पवार, मधुकर गवळी,सुनील राजपूत, अनिल राऊत, भुषण पाटील, रवींद्र जाधव, नितीन सूर्यवंशी, पंकज शिरोडे ,सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.