चाळीसगाव – (प्रतिनिधी)- जळगांव जिल्हा सहकारी बोर्ड व चाळीसगाव विविध विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ६७ वा अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा सांगता समारोह दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील बाजार समिती आवारात मोठ्या उत्साहात झाला. सहकारी संस्थानी आत्मनिर्भर राहण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन चाळीसगाव तालुका सहकारी संस्था निंबधक प्रदीप बागुल यांनी केले.
यावेळी जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, जिल्हा सहकारी बोर्डाचे माजी संचालक डॉ. कर्तारसिंग परदेशी, बाजार समितीचे प्रशासक व्ही एम जगताप यांनी प्रमुख मार्गदर्शनातून उपस्थित सभासदांना संबोधित केले यावेळी तालुक्यातील विविध विकास सोसायटीचे पदाधिकारी, संचालक मंडळ, बँकेचे क्षेत्रीय अधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी वसंत पाटील, बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास पाटील, माजी उपसभापती जालम पाटील, दिनेश पाटील, चाळीसगाव सोसायटीच्या व्हाईस चेअरमन कविता महाजन, भास्करराव चव्हाण, विश्वास देशमुख, हिम्मतराव पाटील, प्रकाश देशमुख, बापू चौधरी, धनंजय मांडोळे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंदराव शितोळे यांनी केले तर आभार बाळासाहेब आगोणे यांनी मानले.