चाळीसगावात सोशल क्लबच्या नावाखाली चालणार्या जुगार अड्ड्यावर पोलीसाचे छापे

0
  साहित्यासह जुगारी अटकेत,
चाळीसगाव :-(प्रतिनिधी ) चाळीसगावात सोशल क्लबच्या नावाखाली चालणाऱ्या दोन जुगार अड्ड्यांवर चाळीसगाव पोलीसांनी धाडी टाकून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या 70 जणांना अटक केली, त्यांच्याकडून सुमारे 1लाख 46 हजार 200 रूपयांची रोकड व पत्याचे कॅट तसेच जुगाराची साधने जप्त केली. एकाच रात्री दोन क्लबवर धाडी टाकल्याने शहरासह तालु्नयात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही क्लबवर दोन महिन्यापूर्वीही धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यांच्यावर कारवाई होवूनही पुन्हा जुगार खेळतांना कारवाई करण्यात आल्याने चर्चेला उधान आले आहे. आणि चाळीसगाव असे अनेक जुगार अड्डे आहेत त्यांच्यावर मेहरबानी का ? असाही सवाल उपस्थित होत आहे,
शहरातील
दुध एरीया भागात टाकलेल्या छाप्यात 11 तर बस स्थानकाजवळील जुगार अड्डयावर टाकलेल्या छाप्यात 48 अशा 59 जणांना अटक करण्यात आली आहे. शहरात एकाच वेळी अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच झाली आहे. जुगारींमध्ये चाळीसगावसह उत्तर प्रदेश, बिहार, कन्नड, औरंगाबाद, मालेगाव, मुंबई, ठाणे येथील जुगारींचा समावेश आहे.
    या घटनेची माहिती अशी की, चाळीसगाव शहरात बस स्थानक शेजारी असलेल्या लकी कॉम्पले्नसमधील दुसऱ्या मजल्यावर पश्चिम बाजुस एका हॉलमध्ये एम स्पोर्ट नावाची संस्था जळगाव उपशाखा चाळीसगाव या क्रीडा संस्थेच्या बंद खोलीत संजय विश्राम राठोड नावाची एक व्यक्ती सोशल क्लबच्या नावाखाली स्वत:च्या फायद्याठी लोकांकडून पैसे स्वीकारून पत्ता जुगाराचा व सट्टा जुगाराचा खेळ खेळत असल्याची माहिती चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांना मिळाली. त्यांच्या आदेशान्वये शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव, हवालदार बापुराव भोसले, पोकॉ गणेश पाटील, विजय पाटील, गोपाल बेलदार, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील तसेच डीवायएसपी कार्यालयातील  हेकॉ भाऊसाहेब पाटील, रावते, काळे, शिपाई हमदु तडवी यांच्या पथकाने काल गुरुवार दि.19 रोजी रात्री 7.50 वाजेच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी जुगारी जुगार खेळतांना आढळून आले.पोलीसांच्या पथकाने जुगार चालवणाऱ्या संस्थेची कागदपत्रे मागितली असता ती दिली नाही. पोलीसांना जुगाराच्या घोळात 14 हजार रूपये रोख व जुगाराची साधने मिळून आली. तसेच पथकाने जुगारींची अंग झडती घेतली. त्यात 96 हजार रूपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी विनोद नानाजी काकडे,( मौलीनगर, मनमाड,) प्रकाश वसंतराव वाबळे,( मुक्ताईनगर) कॉलनी,मलकापूर, विजय केदू निमसे,( रमाबाई आंबेडकर नगर, मनमाड,) प्रेमशंकर गणेशीलाल धीमर,( विरमपूर, कडोली, अलीगड उत्तरप्रदेश,) लालचंद नारायणदास रत्नानीख राजा( बजाज कॉलनी, औरंगाबाद,) आनंद दगडू चव्हाण,( मेहूणबारे,) तुकाराम सुकलाल चव्हाण,( जागीरदारवाडी, चाळीसगाव,) शेरखान रमजान खान,( पंचशीलनगर, चाळीसगाव), विष्णु गणेशीलाल,( विरमपुर थाना लोधा तहसील गभाना अलीगड उत्तरप्रदेश,) राहूल राजेंद्र परदेशी,( निमगाव, मालेगाव, )अब्दुल वाहीद मोहम्मद सिद्धी, (संगमेश्वर, मालेगाव,) विजय हिलालसिंग पाटील,( बोहार्डी, ता. भुसावळ,) राजेंद्र कौतीक पाटील,( पिलखोड), जगन्नाथ बंडू कोठावदे,( एमजीनगर, चाळीसगाव, )अशपाक अहमद जमील,( श्रावस्तीनगर, नांदगाव,) संदीप गंगाराम शिंपी,( जहागिरदारवाडी, चाळीसगाव), संदीप विक्रम पाटील, (उपखेड,) शकील खान अकबर खान, कैसर( कॉलनी,जिन्सी, औरंगाबाद,) जाकीर शेख साबीर शेख, (रमजान कॉलनी, औरंगाबाद,) चंद्रभान वामन चौधरी,( शिवशक्तीनगर, चाळीसगाव,) राजेंद्र मेघराज अग्रवाल,( संगमेश्वर, मालेगाव,) नाशिर मजीदखान,( कटकट गेट, मसुद कॉलनी, औरंगाबाद), सुरेश काशीनाथ शर्मा, (मेन रोड, मालेगाव कॅम्प,) विलास शिवाजी पाटील,( संगमेश्वर, मालेगाव,) सैय्यद इ्नबाल उस्मान कादरी, (चंदन कोळीवाडा, ठाणे,) सुभाष पुनमचंद जैन,( सावता नगर, मालेगाव,) जफ्फार हुसेन( करार,सिटीचौक, औरंगबाद,) नथ्थुराम जगजी पटेल,( लक्ष्मीनगर, चाळीसगाव,) मोहन रघुनाथ चौधरी, (चौधरी वाडा, चाळीसगाव,) विष्णु लक्ष्मण वाघ,( मलकापूर, बुलढाणा,) योगेश आत्माराम चौधरी,( सरस्वती कॉलनी, कन्नड,) युसूफ खान फकीर मोहम्मद, (नांदगाव, नाशिक,) गोकुळ त्र्यंबक चौधरी, (वैभव मंगल कार्यालयजवळ,चाळीसगाव, )मोहम्मद युसूफ मोहम्मद अयुब,( मोमीनपुरा, मालेगाव,) गणपत दयाराम चौधरी,( आखातवाडे, ता. पाचोरा,) शेख शफीक शेख आसीफ, (कमलपुरा, मालेगाव, )अब्बास मकबुल बागवान, (नेवासा खुर्द, ता. नेवासा), अफजल बाबुलाल पठाण,( नेवासा खुर्द ता. नेवासा,) दत्तु विठ्ठल पाटील, (नेताजी चौक, चाळीसगाव), मनोज मेघल पंडीत,( मधुपुर, पो. गगतपुर, ता. चकाया, जि.जमुनी, बिहार,) सत्यनारायण देवीप्रसाद मिश्रा,( सिद्धी विनायक कॉलनी, चाळीसगाव,) राजेंद्र छोटु मंडळ, (सरिया खुर्द, जिल्हा गिरडोह, झारखंड, )अनिल देवसिंग राजपूत, (जहागिरदारवाडी, चाळीसगाव,) शकील अहमद मुस्तफा,( रोनकाबाद, मालेगाव,) जमील अहमद मोहम्मद इद्रीस, (रविवारवाडा मालेगाव )व संजय विश्राम राठोड, (पिंपरखेड, ता. चाळीसगाव )अशा 48 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 96 हजार 300 रूपयांची रोकड जप्त केली. त्यांच्या विरोधात हवालदार बापुराव भोसले यांच्य फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम 12 अ, 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हे करीत आहेत.
दुध डेअरी भागातही छापा
    दुसरी कारवाई पोलीसांनी शहरातील दुध डेअरी एरिया भागातील जुगार अड्ड्यावर केली. येथे काल रात्री 8 वाजता अप्पर पोलीस अधीक्षेक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी कैलास गावडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही व डीवायएसपी तसेच शहर पोलीस ठाण्यातील पोलीसांच्या पथकाने छापा टाकला असता भारतीय क्रीडा संस्था, जळगाव उपशाखा चाळीसगाव  या संस्थेत सोशल क्लबच्या नावाखाली झन्नामन्ना नावाचा जुगार खेळतांना 11 जुगारी मिळून आले. त्यांच्याकडून पोलीसांनी रोख 49 हजार 900 रूपये व पत्याचे कॅट तसेच सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली. जुगार खेळणाऱ्या संजय बाळासाहेब देशमुख,( रांजणगाव, )सुनील अंबरसिंग पवार,( जहागिरदारवाडी, चाळीसगाव,) महेंद्र दामोदर सोमासे, (मालेगाव,) नितीन भिमराव जाधव, (मालेगाव,) सत्यनारायण जयगोपाल, (विक्रोळी, मुंबई, )गणेश दामोदर सोनवणे, (मालेगाव,) अण्णा सुकदेव केदार,( कोळगाव, )रमेश वाल्मीक मांडोळे, ( फुले कॉलनी, चाळीसगाव,) सचिन पांडुरंग सुर्यवंशी, अदिलशहा युनुसशहा,( घाटरोड, चाळीसगाव,) सुरेश गुलाबराव देशमुख,( जयबाबाजी चौक, चाळीसगाव )यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पोलीस नाईक गणेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम 12 अ, 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही हे करीत आहेत.
** दोन महिन्यांत याच क्लबवर पोलीसाचे छापे ***
शहरात पोलीसांनी कारवाई केलेले दोन्ही जुगार अड्ड्यांवर दोन महिन्यापूर्वीही पोलीसांनी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर जुगारींना पकडले होते.आता पुन्हा टाकलेल्या छाप्यामुळे शहरासह तालु्क्यात एकच खळबळ उडाली आहे.शहरात सोशल क्लबच्या नावाखाली सर्रास जुगार चालत असल्याच्या घटनेला या छाप्यांमुळे पुष्टी मिळाली आहे. दोन्ही गुन्ह्यातील आरोपींची जामीनावर मुक्तता करण्यात आली.
Leave A Reply

Your email address will not be published.