चाळीसगावात मुख्यमंत्री कमलनाथ यांचा शिवप्रेमी संघटनांच्या वतीने पुतळा दहन

0

चाळीसगाव प्रतिनिधी – मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर शहरात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सौंसर प्रशासनाने जे सी बी च्या साह्याने काढण्यात आला त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याची  विटंबना झाली त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटताच  चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमी संघटनांच्या वतीने दि १३ रोजी दुपारी ३ वाजता मध्यप्रदेश सरकारच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री कमलनाथ यांचा पुतळा दहन करण्यात आला यावेळी परीसर घोषणानी दणाणून गेला

छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीना सोबत घेऊन रयतेचे   स्वराज्य निर्माण  करून गोरगरिबांवरील अन्याय थांबविला त्यांच्या स्वराज्यात महिलावर देखील अन्याय होत नव्हते एवढी जरब त्यांनी निर्माण केली असताना न्याय प्रिय  जाणता राजा म्हणून शिवाजी महाराज यांची किर्ती असताना त्यांच्या पुतळ्याला हात लावण्याची मजाल मध्यप्रदेशात होतीच कशी .शिवरायांनी बुऱ्हानपूरावर आक्रमण करून मोघलांची पुरती दैना उडवली होती हे मध्यप्रदेश सरकार विसरले की काय. कुणी उठावे महाराजांची विटंबना करावी हे महाराष्ट्रात कदापि खपवून घेतले जाणार नाही ही  राज्यकर्त्यांना शिवप्रेमी जनतेचे चेतावणीच आहे हे  लक्षात ठेवावे अन्यथा जनता यांना कायमचा धडा शिकविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.  सौंसर शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा रहदारीला कुटलाही अडथळा नसताना दि ११ /२/२०२० रोजी रात्री ४ वाजता अंधाराचा फायदा घेऊन ज्या प्रकारे  अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सौंसर प्रशासनाने जे सी बी च्या साह्याने काढण्यात आल्याने शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले . शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने  निषेध म्हणून चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमी संघटनांच्या वतीने दि १३ रोजी दुपारी ३ वाजता मध्यप्रदेश सरकारच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री कमलनाथ यांचा पुतळ्याचे  दहन करण्यात आले यावेळी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,खुशाल पाटील,ज्ञानेश्वर कोल्हे ,पंकज पाटील,भरत नवले ,स्पनिल गायकवाड,अमोल देठे ,आबा पाटील,जयदीप पवार,आकाश धुमाळ,सुनिल निंबाळकर,सागर पाटील,सागर पाटील,

समर्थ भोसले ,किशोर स्वार ,रविंद्र जाधव ,कुलदीप पाटील ,संभाजी पाटील निलेश जगताप ,भगवान जगताप, महेश दौंड ,आकाश गुंजाळ, मुन्ना देशमुख, संतोष गाढवे अविनाश जगताप उदय पाटील  अक्षय कुंभार सचिन पवार सागर पाटील निलेश जगताप चिरागाउद्दीन शेख, भाऊसाहेब पाटील सोनु साळुंखे चेतन पाटील ,भूषण पाटील अदि उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.