चाळीसगावात कार पूलावरून कोसळली ; एक ठार तर चार जखमी

0

चाळीसगाव :- शहराकडून धुळेकडे जाणार्या भरधाव वेगात असलेल्या ओमनी या वाहनाने रेल्वे पूलावरील पदचारीस तुडविले. यावेळी ओमनीचा चाळीसगाव शहराकडे येत असलेल्या दुचाकीला कट लागल्याने दुचाकीवरील दोन जण जखमी झाले. या वाहनाचा वेग इतका होता की, ओमनीने रेल्वे पूलावरील लोखंडी साईट कठडे तोडून पूलाच्या खाली असलेल्या वेल्डिंग प्लांटवर कोसळली.

या अपघातातील अनोळखी पादचारी जागीच ठार असून ओमनीत असलेल्या दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर दुचाकीस्वारांना धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याबाबत अजून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.