चाळीसगाव :- शहरातील हिरापूर रोडवरील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज (दि.१६) सकाळी उघडकीस आला आहे. ही घटना आज सकाळी ५:३० ते ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
शहरातील जेडीसीसी बँकेच्या शाखेत रात्री अज्ञात चोरट्यांनी बँकेचे शटर तोडून बँकेतील 200 ते 300 कीलो वजनाची तिजोरी बँकेतून बाहेर ओढत आनुन तिजोरीला फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र चोरट्यांन कडून तिजोरी फुटली नाही म्हणून चोरट्यांना घटनास्थळावरून पोबारा करांवा लागला आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस पोहोचले असुन बँकेच्या शाखेतील मँंनेजरला संर्पक करण्यात आला आहे. सदर बँकेतुन कुठलीही रोख रक्कम गेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दरोड्याचा तपास चाळीसगाव पोलीस करीत आहे.