चाळीसगावला नकली लेबल तयार करून खाद्यतेलाची विक्री

0

चाळीसगावः-(प्रतिनिधी) चाळीसगाव शहरातील एकेकाळी नामांकित असलेल्या खानदेश एक्स्ट्रक्शन कंपनीने अधिकृत नोंदणी केलेला ट्रेडमार्क व रजिष्टर लेबलचा आर्टवर्क नसतांना हुबेहुब नक्कल करुन खाद्यतेलाची विक्री केली करणा-या हिरापूर म्हणून  खान्देश एक्स्ट्रक्शनमधील गोडावूनवर मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसीव्हर पथकाने काल दुपारी दोन वाजता कारवाई करीत  गोडावून मधील पाच ते सहा लाख रुपये किंमतीचा माल सील करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चाळीसगाव तालुक्यात  खळबळ उडाली आहे.

या घटने बाबतची माहिती अशी की, धुळे एमआयडीसीतील सोया खाद्यतेल बनविणा-या कंपनीच्या नोंदणीकृत रजिस्टर्ड ट्रेडमार्क आणि रजिष्टर लेबल आर्टवर्क सारखेच डिझाईन तयार करुन सोया अमृत नावाने खाद्यतेल विक्री केली जात असल्याची माहिती शिवाय एकसारखेच आर्टवर्क आणि सारखाच कलर असलेलं लेबलचा वापर करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर  यावर धुळे येथील संजय सोया कंपनीचे डायरेक्टर संजय अग्रवाल यांनी त्यांच्या अधिकृत मान्यता असलेल्या नोंदणीकृत रजिस्टर्ड ट्रेकमार्क व लेबलचा आर्टवर्क सादर करुन मुंबई उच्च न्यालयात धाव घेतली.आणि खानदेश एक्स्ट्रक्शन या कंपनी विरोधात कारवाईची मागणीही केली.

त्यानुसार न्यालयाने रिसिव्हर पथकाची नेमणूक करुन कारवाईचे आदेश दिले. मंगळवारी दुपारी पथकाने गोडावून मध्ये जाऊन एक किलो वजनासह पाच व पंधरा किलो वजनाचे पाऊच, बॕरल व डबे असा एकुण पाच ते सहा लाखाचा माल सील केला असल्याची माहिती आहे,.

ऐन दिवाळीच्या सणासुदीत चाळीसगावात खाद्यतेलाबाबत ही दुसरी कारवाई आहे. पाच रोजी अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने चाळीसगाव येथेच चार लाख रुपये किंमतीचा भेसळयुक्त खाद्यतेलाचा मुद्देमाल जप्त होता,. दिवाळीत खाद्यतेलाची मोठी मागणी असते. यापार्श्वभूमीवर झालेल्या कारवाईमुळे खळबळ निर्माण झाली आहे.

धुळे येथील सोया ड्राप या कंपनीचे संचालक संजय अग्रवाल यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की आमच्या खाद्यतेल बनविणा-या कंपनीचा नोंदणीकृत रजिस्टर्ड ट्रेडमार्कआहे. लेबलचे आर्टवर्क व डिझाईनही नोंदणीकृत आहे. याची नक्कल करुन चाळीसगावात खाद्यतेलाची विक्री होत आहे. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये ही कारवाई झाली आहे. यामुळे अनधिकृत ट्रेडमार्क व लेबलचा वापर करुन खाद्यतेल विक्री करणा-यांना चाप बसणार आहे.

– संजय अग्रवाल,

आम्ही सोया अमृत नावाने नोंदणी व रजिष्टर लेबल आर्टवर्क, डिझाईनसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. आमचे लेबल व डिझाईन वेगळे आहे. एकसारखे नाही.

– क्रिष्णकुमार माहेश्वरी

चाळीसगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.