चाळीसगावचे संजय अग्रवाल उद्योगपती यांची धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या चिफ पेट्रनपदी निवड

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव येथील मुळ रहिवासी व येथे उद्योग धंद्या निमित्त धुळे येथे स्थायिक झालेले  धुळे येथील उद्योगपती संजय अग्रवाल यांची धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या मुख्य आश्रयदाता पदी (चिफपेट्रनपदी) नियुक्ती झाल्याने संपूर्ण धुळे जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

सदरची निवड धुळ्याचे माजी आमदार व धुळे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे  यांनी केली असून धुळयाचे प्रसिद्ध उद्योगपती संजयशेठ काशिनाथ अग्रवाल यांचेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, धुळे जिल्ह्यातील लैकिकात तालीम  महासंघाचा हा मानाचा तुरा असून त्या संघाच्या चिफ पेट्रनपदी संजय अग्रवाल यांची नियुक्ती झाल्याने संपूर्ण धुळे जिल्ह्यात कुस्तीगिर तालीम  मल्लांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातून व चाळीसगाव  तालुक्यातून संजय अग्रवाल यांचे अभिनंदन होत आहे संजय अग्रवाल हे चाळीसगाव येथील उद्योगपती नारायण भाऊ अग्रवाल यांचे चिरंजीव असून येथील रघुवीर व्यायाम शाळेचे सदस्य आहेत अग्रवाल कुटुंबाचे कुस्ती क्षेत्रात मोलाचे योगदान असून लाल माती  व गादी या़चेशी पक्की नाड जुळलेली आहे जिल्हा नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून  नामवंत पहीलवानांचा चाळीसगांव येथील लाल माती व गादी  कुस्ती आखाडा परीचित आहे स्व.भगवान शेट अग्रवाल हे तरूण वयातच या क्षेत्राकडे वळले व रघुवीर व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष होते.

चाळीसगाव शहरात  कुस्तीचाआखाडा स्व. बबबआबा देशमुख व भगवान अग्रवाल यांची पक्की नाड जुळलेली होती तेव्हा पासून   जिल्ह्यातील संपूर्ण पहीवानांची व या तालीम संघाच्या लाल मातीसी अग्रवाल कुटुंबाची पक्की नाड जुळली आहे भगवान अग्रवाल नंतर या कुस्तीचा आखाडा स्व.गोपालभाऊ अग्रवाल यांनी सांभाळला  आपला व्यापार उद्योग सांभाळून अग्रवाल कुटुंब  हा वारसा अखंड जोपासत आहे भविष्यात लाल माती व गादी यातून तयार होणारे मल्ल हे राष्ट्राची भावी संपत्तीआहे अखंड चांगले मल्ल तयार व्हावेत व राज्यभरातून चाळीसगावचे कुस्तीगिर क्षेत्रात नाव लैंगिक रहावं  त्यांच प्रमाणे धुळे जिल्ह्यातील माजी आमदार राजवर्धन कदमबांडे साहेब यांनी   अग्रवाल कुटुंबातील संजय अग्रवाल यांची नियुक्ती केली असावी कुस्तीगीरासाठी संजय अग्रवाल उद्योगपती यांच्या खूप मोठं मोठ्या कल्पना आहेत चाळीसगाव येथे दरवर्षी भव्य कुस्तीचा आखाडा गाजत असतो राज्यभरातील नामांकित पहीलवान  चाळीसगाव येते असतात  रघुवीर व्यायाम शाळेचे सर्व नियोजन अग्रवाल परीवार व देशमुख परीवार करीत असतातआता धुळे जिल्ह्यात सुंध्दा  संपूर्ण तालीम संघाची जबाबदारी संजय अग्रवाल उद्योगपती यांचे कडे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी सोपविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.