भुसावळ येथील राष्ट्रीय परिषदेत डॉ.विश्वास पाटील यांचे प्रतिपादन
भुसावळ : चारित्र्या शिवाय शिक्षण आणि तत्वा शिवाय राजकारण करणे पाप आहे. गांधीजींच्या मूल्यांना जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. त्यांचे विचार जीवनाला खूप महत्व देतात. गांधी विचार हे राजकारण, अर्थकारण, शैक्षणीक व साहित्य क्षेत्रात महत्वाची भूमिका निभावताना दिसतात. ईश्वर सत्य आहे की नाही हे माहीत नाही पण सत्य ईश्वर आहे. आज आपण आपला पैसा शस्त्रावर खर्च करायचा की शिक्षणावर हा जगासमोर प्रश्न आहे. असे प्रतिपादन शहादा येथील गांधी विचारवंत, प्राचार्य डॉ.विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
येथील कला,विज्ञान व पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मानव्यविद्या शाखांतर्गत महात्मा गांधींच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त ‘म.गांधींच्या विचारांची समर्पकता’ या विषयावर दि 4 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन प्रमुख बीजभाषक सुप्रसिद्ध गांधी विचारवंत प्राचार्य डॉ.विश्वास पाटील शहादा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसाटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, गांधी विचारांची खरी गरज भारतातील आजच्या परिस्थितीला आहे. भारतातील सर्व घटकांना गांधी विचार प्रेरणादायी व मार्गदर्शन करणारे आहेत.व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन महेश फालक, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, प्राचार्य डॉ.सौ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हााटे, उपप्राचार्य डॉ.एन.इ.भंगाळे, परिषदेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, सि.डी.सिचे सदस्य डॉ.जे.एफ.पाटील, उप समन्वयक डॉ.आर.एस.नाडेकर आदी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर दोन स्वतंत्र कक्षात दोन सत्रामध्ये शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले. पहिल्या सत्रात सत्र अध्यक्ष म्हणून डॉ.मनोज गायकवाड यांनी कामकाज सांभाळले.तर दुसर्या कक्षात डॉ.सुरेश तायडे यांनी सत्र अध्यक्षाचे कामकाज गणीय सांभाळले. दुपारच्या सत्रात डॉ.दिनेश महाजन व प्रा.दिनेश भोळे यांनी कामकाज सांभाळले. गांधी विचारांवर आधारित जवळजवळ 150 प्राध्यापकांनी आपले शोध निबंध सादर केले.त्यात त्यांनी गांधीजींच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय ,ऐतिहासिक भाषा विषयक विचारांवर आधारित कथन केले.
समारोप सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.सौ.मीनाक्षी वायकोळे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे सिनेट सदस्य प्रा.इ.जी.नेहेते हे होते. प्रास्ताविक परिषद समन्वयक उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.रेखा गाजरे, डॉ.रुपाली चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.एस.पी.झनके, डॉ.के.के.अहिरे, डॉ.रेखा गाजरे, डॉ.पी.ए.अहिरे, डॉ.किरण वारके, डॉ.डी.एम.टेकाडे, डॉ.स्मिता चौधरी, प्रा.व्ही.ए.सोळुंके, प्रा.डी.एन.पाटील, प्रा.एस.के.राठोड, डॉ.सचिन राजपूत, डॉ.प्रफुल्ल इंगोले, प्रा.एस.टी.धूम, डॉ.रुपाली चौधरी, प्रा.पुरुषोत्तम महाजन, प्रा.निनू झोपे, प्रा.जितू अडोकार, प्रा.दीपक शिरसाट, प्रा.दिनानाथ पाठक, डॉ.सुषमा तायडे, डॉ.स्वाती महाजन, प्रा.भारती सोनवणे, प्रा.भूषण धनगर, प्रा.निखिल तायडे, प्रा.शिबा खान यांनी प्रयत्न केले. तसेच सदर परिषदेला भारतातील वेगवेगळ्या राज्यातून संशोधक प्राध्यापक उपस्थित होते.