Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चारचाकीसह 7 लाखाची लुट करणारा दुसरा आरोपी जेरबंद
    गुन्हे वार्ता

    चारचाकीसह 7 लाखाची लुट करणारा दुसरा आरोपी जेरबंद

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 12, 2021Updated:August 12, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    वसुली करुन घरी परत जाणा-या  साखरेचे  व्यापारी  कारचालकाच्या ताब्यातील कार व कारमधील 7 लाख 90 हजार रुपयांची रोकड लुट करणा-या दुसऱ्या  फरार आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास भोपाळ येथून अटक केली आहे. तुकाराम दिनकर पाटील रा. सामनेर ता. पाचोरा (हल्ली मुक्काम बरखळा पठाणी भोपाळ मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील दिपक साहेबराव चव्हाण सामनेर ता. पाचोरा हल्ली मुक्काम गिरड ता. भडगाव यास 14 मार्च 2021 रोजी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

    7 मार्च 2021 च्या मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास वावडदा ते म्हसावद दरम्यान सदर रस्तालुटीची घटना घडली होती. कारसह रोकड अशी एकुण 12 लाख 50 हजार रुपयांची लुट केल्याप्रकरणी सदर गुन्हा एमआयडीसी पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आला आहे.

    नाना नथु पाटील (वय ५१) हे मारुती स्विफ्ट कारचे (एमएच-02 इआर 5382) चालक एरंडोल येथील रहिवासी आहेत. एरंडोल येथील साखरेचे व्यापारी मनोज गोकुळदास मानुधने आणि कारचालक नाना पाटील एकमेकांचे परिचीत आहेत. मानुधने यांच्या सांगण्याप्रमाणे नाना पाटील हे शेंदुर्णी, सोयगाव, गोडेगाव, उडणगाव, सिल्लोड येथील व्यापा-यांकडील उधारी वसुल करण्यासाठी कारने गेले होते. विविध गावच्या व्यापा-यांकडील साखरेच्या मालाची 7 लाख 90 हजार रुपयांची वसुली केल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला लागले होते. रविवारी मध्यरात्री वावडदा आणी म्हसावद गावाच्या दरम्यान सव्वा वाजेच्य सुमारास त्यांच्या ताब्यातील कारला ओव्हरटेक करत एक कार पुढे गेली. ओव्हरटेक करणा-या कारचालकाने नाना पाटील यांच्या कारच्या पुढे त्याच्या ताब्यातील कार आडवी लावली. त्यामुळे नाना पाटील यांना नाईलाजाने कार उभी करावी लागली.

    कारमधून उतरलेल्या चार इसमांपैकी दोघांनी कारचालक नाना पाटील यांना दरवाजा उघडून खाली ओढले. त्यांना खाली पाडून एक इसम त्यांच्या छातीवर व एक त्यांच्या पायावर बसला. इतर दोन इसम पुन्हा कारमधे गेले. छातीवर व पायावर बसलेल्या दोघा इसमांनी नाना पाटील यांच्या ताब्यातील कार घेवून पसार झाले. या घटनेनंतर कारचालक नाना पाटील यांना काहीही समजेनासे झाले.त्यांनी आपल्या नातेवाईकांसह साखरेचे व्यापारी मानुधने यांच्या कानावर सर्व प्रकार घातला. कुणाकडून किती रोकड वसुल केली होती. त्याची जुळवाजुळव केल्यानंतर कारसह लुटून नेलेल्या रोकडप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

    अटकेतील तुकाराम पाटील यास न्या. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 16 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.अमोल मोरे व त्यांचे सहकारी करत आहेत. आरोपीस भोपाळ येथून अटक करण्याकामी पोलिस नाईक गणेश शिरसाळे, मुकेश पाटील व हेमंत पाटील यांनी परिश्रम घेतले. आरोपी गुजरात व पंजाब राज्यात पोलिसांना गुंगारा देत फिरत होता.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news jalgaon news latest news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif