Monday, September 26, 2022

चाकूचा धाक दाखवून २ मोबाईलसह रोकड लांबविली

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहरातील पिंप्राळ भागातील सोमानी गल्लीत चाकूचा धाक दाखवून दुकानदाराकडून दोन मोबाईल आणि आठशे रुपये रोकड असा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

संदीप शरद सोमानी (वय ४१, रा. सोमाणी गल्ली, पिंप्राळा, जळगाव) हे शुक्रवार १० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानावर असताना ३ जण अचानक आले. त्यांच्यातील अक्षय बन्सीलाल धोबी उर्फ बाबू, जय सुतार, गोलू (पूर्ण नाव माहित नाही) यांनी चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ केली व तुझ्याकडे काय आहे ते लवकर गल्ल्यातून काढ असे बोलून गल्ल्यातून ८०० रुपये काढले व फिर्यादीच्या हातातून दोन मोबाईल जबरी हिसकावून पसार झाले.

याप्रकरणी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास संदीप सोमानी यांच्या फिर्यादीवरून ३ जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पीएसआय गोपाल देशमुख करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या