चाकूचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार

0

दोन जणांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल पहूर, ता.जामनेर (वार्ताहर )पहूर येथे चाकूचा धाक दाखवून वीस वर्षीय तरुणीवर जबरी संभोग केल्याची घटना घडली असून दोन जणांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की 10 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी दहा ते दूपारी तीन वाजेदरम्यान पहूर येथे पावर हाऊस झोपडपट्टी पाण्याच्या टाकीजवळ शेंदूर्णी रोडवर सार्वजनिक जागी यातील आरोपी गौरव राजू कुमावत, व भिक्या तडवी पुर्ण नाव माहित नाही दोन्ही राहणार पावर हाऊस झोपडपट्टी पहूर यांनी फिर्यादिस साक्षीदार कैलास माळी यांच्या रिक्षात बळजबरीने बसवून पटवून नेऊन भारूडखेडा शिवारात असलेल्या झोपडीत वरील दोन्ही आरोपीने फिर्यादिचे संमतीवीना चाकूचा धाक दाखवून जबरी संभोग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निता फारस पवार वय वीस धंदा कटलरी रा.पावर हाऊस झोपडपट्टी पाण्याच्या टाकीजवळ पहूर, ता जामनेर यांनी पहूर पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गौरव राजू कुमावत, व भिक्या तडवी पुर्ण नाव माहित नाही दोन्ही राहणार पावर हाऊस झोपडपट्टी पहूर यांच्या विरूद्ध पहूर पोलीस स्टेशन ला भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर 104 सीसीटीएनएस नं.230/2019 भादवि कलम 365, 376 ड , 506, 34 अ.जा.ज.अ.प्रती.का.कलम 3 (1), w (ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.