चाकूचा धाक दाखवून कपाशी व्यापाऱ्याचे सात लाख लुटले

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

कापूस व्यापारी मोटरसायकलने जात असताना सोनाळा फाट्याजवळ त्यास अज्ञात चार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सात लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे.

सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात. आज ते नेहमीप्रमाणे सोनाळा गाव येथील राहत्या घरापासून पहूरकडे निघाले होते. सोनाळा ते सोनाळा फाटा दरम्यान पप्पू टी स्टॉल पासून 200 मीटर अंतरावर मोटरसायकलवर दोन जण त्यांचा पाठलाग करत होते. तर तलावाजवळ आधीच दोन जण थांबलेले होते. आज दि.२४ नोव्हेंबर रोजी, सकाळी आठ वाजेच्या सुमारास तलावाजवळ थांबलेल्या दोघांनी संजय पाटील यांचे मोटरसायकल काढून घेतली. आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळ असलेले सात लाख रुपये लुटल्याची घटना घडली.

ड्रामायन, घटनास्थळी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे, पहूर पोलिस स्टेशनचे पीआय अरुण धनवडे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे यांनी भेट दिली. या बाबत कपाशी व्यापारी संजय पाटील यांनी पहूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध ४५७|२०२१ भादवि कलम ३९२,३४१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे, हंसराज मोरे हे करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here