चांद्रयान 2 करणार आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश!

0

नवी दिल्ली  – इस्रोचा महत्वकांक्षी प्रोजेक्‍ट असणारा चांद्रयान 2 या मोहिमेसाठी आजचा दिवस महत्वाचा मानला जात आहे. आज चांद्रयान 2 ला चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्यासाठी इस्त्रोचे वैज्ञानिक लिक्विड इंजिन प्रज्वलित करतील. सकाळी 8.30 ते 9.30 च्या दरम्यान ही प्रक्रिया पार पडेल.

ही एक अवघड प्रक्रिया आहे असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान 2 ला चंद्राच्या जवळ नेण्याचे आणखी चार टप्पे असतील असे इस्त्रोकडून सांगण्यात आले.

विक्रम लॅंडर 2 सप्टेंबरला चांद्रयान 2 पासून वेगळा होईल. सात सप्टेंबरला लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. जीएसएलव्ही एमके 3-एम 1 प्रक्षेपकाद्वारे 22 जुलैला चांद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर टप्याप्याने त्याची पृथ्वीपासून कक्षा वाढवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.