घरापासून ते शेताच्या बांधापर्यंत भगवा पोहचला
धरणगाव/ जळगाव प्रतिनिधी
शिवसेना भाजपा महायुतीचे दिग्गज उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचार चांदसर,दोनगाव व लाडली परीसरातील 20 गावांमध्ये संपन्न झाला. प्रचार रॅलीमध्ये युवकांचा उत्साह दिसून आला.या भागातील प्रत्येक गावांत केवळ धनुषयाबाणा चाच जोर दिसून आला.घराघरात जाऊन मतदारांशी संपर्क केला जाऊन चक्क रस्त्यावरील शेतात काम करणार्या मतदारांशी गुलाबराव पाटील यांनी भेट घेतली. यावेळी मतदारांनी आशीर्वाद देऊन विजयी करण्याचे वचन दिले.
पाळधी – बांभोरी प्र चा या जिल्हा परिषद गटातील चांदसर ,कवठळ , चोरगाव झुरखेडा ,निमखेडा ,धार ,शेरी,पाथराडबु, वंजारी खपाट, पथराड खुर्द, बोरखेडा, पिंपळे सिम, दोनगाव बु, दोनगाव खुर्द, रेल, लाडली ,फुलपाट, टहाकळी ,आव्हाणी, भोकणी व सावखेडा या परिसरात महायुतीचे दिग्गज उमेदवार गुलाबराव पाटील यांचा प्रचार संपन्न झाला. गुलाबराव पाटील यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून देण्यासाठी या भागातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारांनी पक्का निर्धार करून कार्यकर्ते कामाला लागले आहे.
जळगाव तालुक्यातील ममुराबाद ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादीचे सरपंच , ग्रा. पं. सदस्य आणि विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेचे दिग्गज गुलाबराव पाटील यांना ममुराबाद व परिसरातुन प्रचंड मताधिक्य मिळवून देऊच असा निर्धार केला.या पदाधिकार्यांच्या प्रवेशाने परिसरात उत्साह निर्माण झाला आहे.
ममुराबाद सरपंच विलास सोनवणे ,माजी सरपंच भरत शिंदे, महेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य विजय शिंदे , पटेल प्रमोद सय्यद मुल्लाजी,नबी मेम्बर ,राहुल लाडके तसेच विकास सोसायटीचे चेअरमन शरद पाटील यांच्यासह कैलास ढाके, राजाराम शिंदे ,राहुल ढाके,आमचं चौधरी, प्रशांत इंगळे, विवेक बराटे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मार्केटचे संचालक अनिल भोळे यांनी याबाबत पुढाकार घेतला.