चहार्डीत कापूस भरलेल्या घराला आग

0

साडे पाच लाखाचे नुकसान

चोपडा-
तालुक्यातील चहार्डी येथील पांडुरंग वामन महाजन यांच्या राहत्या घरात अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने घराला आज 22 रोजी पहाटे दोन वाजता आग लागून प्रचंड नुकसान झाले असून जवळपास चार महिन्यापासून घरात सांभाळून ठेवलेला तब्बल 90 क्विटल कापूस या आगीत भस्म झाला असुन या आगीने शेतकरी पांडुरंग महाजन याचा हाता तोंडातला घास हिरावला गेला आहे.
पहाटे दोन वाजता दोन तीन वेळा लाईट ये जा करत असताना अचानक विजेच्या मीटर जवळ शॉर्ट सर्किट होऊन दोन मजली लाकडी घराला मोठ्या प्रमाणात आग लागल्याने या आगीत 4 लाख 40 हजाराचा90 क्विटल कापूस ,नव्वद हजाराचे सागवान लाकूड, व वीस हजार रुपयांचे संसार उपयोगी साहित्य जळून गेल्याने जवळपास साडे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे माहिती पंचनाम्यात म्हटले आहे.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात पांडुरंग महाजन यांनी फिर्याद दिल्यावरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस कोस्टेबल विद्या इंगळे करीत आहे .
आग मोठ्या प्रमाणात असल्याने चोपडा नगरपालिकेचा अग्निशमन बंब बोलवून आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.