चंद्र दर्शन न झाल्याने मंगळवारपासून रमजान ची सुरवात

0

जळगाव – इस्लाम धर्माचे महत्वपूर्ण रमजान महिन्याला मंगळवार पासून सुरवात होत असून त्या दिवशी पहिला रोजा राहील अशी महत्वपूर्ण घोषणा मौलाना उस्मान कासमी यांनी केली.ईदगाह ट्रस्ट च्या पटांगणात झालेल्या रुयते हिलाल कमिटी व ईदगाह ट्रस्टच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रात कुठेही चंद्र दर्शन झाले नसल्याने हा एकमुखी निर्णय घेण्यात आला असून सोमवार ची सहेरी होईल व मंगळवार चा रोजा ठेवण्यात यावा असे आव्हान करण्यात आले.मुफ्ती अतिक व गफ्फार मळून यांनी आपले विचार मांडले.आज झालेल्या सभेत शहरातील सर्व मशिदीचे इमाम,ट्रस्टी, प्रतिष्टीत व्यक्ती व मुस्लिम ईदगाह चे विश्वस्त हजर होते.

त्यात प्रामुख्याने मुफ्ती अतिक,मौलाना सलीक,मौलाना नासिर,मौलाना अख्तर नदवी,मौलाना जुबेर,मौलाना एजाज,मौलाना फिरोज,मौलाना अब्रार, करीम सालार,अमीन बदलीवाला,डॉ आमनुल्लाह शाह,गनी पिंजारी, सलीम इनामदार,आरिफ देशमुख,अल्तामश,डॉ जावेद,उमर शेख,डॉ ताहेर,सैयद चाँद,नईम बदलीवला,इम्रान शेख

सर्व प्रथम हुझेफा अतिक यांनी कुराण पठण केले,ईदगाह चे जनरल सेक्रेटरी फारूक शेख यांनी प्रास्ताविक केले तर  शेख मुकीम   यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.