जळगाव ।शहरातील समर्थ कॉलनीत घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारीत एलईडी टीव्ही चोरून नेल्याची घटना दि.25 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचारी अरुण सीताराम पाटील(रा.समर्थ कॉलनी) यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर त्यांचे मेहुणे अरुण महाजन याचे देखील घर आहे. अरुण महाजन हे कामानिमित्त पुण्यात गेले हेते. अरुण पाटील हे देखील पत्नीसह बर्हाणपूर जिल्ह्यातील फोपनार येथे गेले होते. दि. 25 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास ते गावाहून परत असल्याने घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडलेला दिसून आला. तर त्यांचे मेहुणे अरूण महाजन यांच्या घराचे कुलूप तोडलेला दिसून आला. अरूण पाटील यांच्या घरातील सामान अस्तव्यस्त केल्यानंतर चोरांच्या हाती काहीही मिळाले नाही. त्यांनी घरातील 30 हजार रूपये किंमतीचा एलसीडी टिव्ही आणि 25 रूपयांची चिल्लर चोरून नेली. याप्रकरणी अरूण पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.