Friday, September 30, 2022

घरातून सोन्याचे दागिने लंपास

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहरातील तुकारामवाडी भागातील घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याची मंगल पोत व कानातील टोंगल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

दिपक समाधान बाविस्कर (वय २२, रा. तुकाराम वाडी, पिपल्स बँकेजवळ जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्याचे दुमजली इमारतीचे घर आहे. १७ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या खालच्या घरात कुणीही नसतांना कीचन मधील लोखंडी कपाटातून ३५ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत आणि १८ हजार रूपये किंमतीच टोंगल असा एकुण ५३ हजार रूपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीला आले.

याप्रकरणी त्यांनी शोधाशोध केली परंतू पोत मिळून आली नाही. बुधवारी २२ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश सपकाळे करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या