जळगाव | प्रतिनिधी
येथील जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार वर्षांपुर्वी घरफोडी केलेल्या फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली.
संदीप अर्जुन गुजर (वय ३१, रा. कुमावत गल्ली, शेंदुर्णी, ता. जामनेर) असे आरोपीचे नाव आहे. गुजर याने सन २०१५मध्ये जिल्हापेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केली आहे. तसेच न्यायालयाच्या एका समन्समध्ये ताे फरार होता. दरम्यान, गुजर हा शेंदुर्णी येथे आला असल्याची माहिती एलसबीचे विजय पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार राजेंद्र पाटील, अनिल इंगळे, सुरेश महाजन, संतोष मायकल, रमेश चौधरी, मिलींद सोनवणे, सचिन महाजन, अशोक पाटील यांच्या पथकाने सापळा रचून गुजर याला ताब्यात घेतले. पुढीत चौकशीसाठी त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडून इतर गुन्ह्यांची उकल हाेऊ शकते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.