चोपडा (प्रतिनिधी) :- चोपडा नगरपालिकेने घरपट्टीत केलेली वाढ पाहून आज डॉ चंद्रकांत बारेला व त्यांच्या मित्रपरिवाराने वाढलेली घरपट्टी कमी व्हावे म्हणून नगरपालिकेवर आज धडक मोर्चा काढला होता. या मोर्चात डॉ बारेला व त्याच्या मित्र परिवाराला अपेक्षित शहर वाशियानी उपस्थिती न दिल्याने डॉ चंद्रकांत बारेला व प्रा शरद पाटील यांनीच या मोर्चाचे नेतृत्व केले. वाढीव घरपट्टी व अन्य समस्यांचे निवेदन यावेळी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे याना आज देण्यात आले.
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन, स्वस्तिक टाकी, बाजारपेठ, मेनरोड मार्गे चोपडा नगरपालिकेवर हा धडक मोर्चा पालिका प्रशासन व सत्ताधारी मंडळींच्या विरोधात विविध घोषणाबाजी करून काढण्यात आला असला. मोर्चेकरांनी दोन तास पालिका आवारात मोठं मोठ्या आवाजाने घोषणाबाजी देऊन पालिका प्रशासन व सत्ताधारी नगरसेवक याचा जाहीर निषेध व्यक्त करून मोर्चेकरांनी संताप व्यक्त केला.
या मोर्चात डॉ. चंद्रकांत बारेला यांनी दिलेल्या निवेदनावर प्रा.शरद पाटील, अर्जुन चौधरी, निलेश जाधव, दीपक वानखेडे, ईश्वर सूर्यवंशी, मंगल बडगुजर, अमोल राजपूत, जियोद्दीन काझी, शकील मण्यार, फिरोज मन्यार सहभागी आहेत.
मोर्चा पालिका आवारात आल्यानंतर प्रा. शरद पाटील, डॉ. चंद्रकांत बारेला, राजेंद्र शिंदे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून वाढीव घरपट्टी, घनकचरा करात केलेल्या वाढीबाबत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आपल्या भावना माडल्या. यावेळी शहरातून निघालेल्या मोर्चात नगरपालिका हाय हाय, प्रशासन हाय हाय, अश्या घोषणा देण्यात आल्या होत्या.
या मोर्चात आयोजक डॉ. बारेला यांना जवळपास एक हजार लोक येतील असा अंदाज वर्तवला असताना आज मात्र प्रत्यक्षात घरपट्टी वाढ विरोधात चोपडा शहरातून फार थोडे लोक मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे अनुपस्थित लोकांना घरपट्टी वाढ मान्य आहे की काय? असे अत्यल्प उपस्थितीवरून वाटत होते. मोर्च्यांत हजारो लोक येतील म्हणून एपीआय मनोज पवार यांच्यासह मोठया संख्येने पोलिसांचा व होमगार्ड याचा फौजफाटा तैनात होता.
ज्यावेळी मोर्चा पालिका आवारात आला तेव्हा मोर्चेकरांनी केलेली भाषणे ऐकून त्यांना मुख्यधिकारी अविनाश गांगोडे यांनी उत्तरे देताना सागितले की, परिषद कलम अनव्ये करपट्टी वाढ ही होत असते.आपण एकीकडे पालिका कडे समस्या मांडून विविध सोयीसुविधा मागत असतांना त्याचे कर देखील देणे ही सर्वांची जबाबदारी आहेच. घरपट्टीची वाढ ही नैसगिक वाढ आहे. शासनाच्या आदेशानुसार आणि जनतेवर कोणतेही अतिरिक्त बोजा पडणार नाही याचा विचार करून हा निर्णय प्रशासन व सर्व नगरसेवकांनी घेतला आहे.२०१५-१६ नंतर ही वाढ झाली आहे. राज्यातील सर्व नगरपालिका ना घनकचरा व्यवस्थापना नुसार दर निश्चित केले आहेत त्यानुसार घनकचरा करात ही वाढ केली आहे. कायद्यानुसार करवाढ झालीच पाहिजे हा शासन आदेश आहे असे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी मोर्चेकरांनी सागितले.
घरपट्टी वाढीच्या विषयाला अनुमोदन करणारे शिवसेनेचे एकमेव नगरसेवक महेंद्र धनगर हे आजच्या मोर्चा वेळी सत्ताधारी नगरसेवकां सोबत दिसून आले. पालिकेत शिवसेना विरोधी बाकावर असून महेंद्र धनगर याची मात्र विशेष उपस्थिती दिसून आली आहे. यावेळी महेंद्र धनगर यांनी सांगितले की, सदर वाढ ही शंभर रुपयाला २५ रुपये नसून फक्त ८ रुपये आहे. शहरात चुकीचा प्रचार काही मंडळी करत असून शोसल मीडियावर चुकीचा प्रचार सुरू आहे. मी या ठरावाला अनुमोदक असून शासनाच्या ध्येय धोरणानुसार च ही वाढ करण्यात आली आहे. मी अनुमोदक असल्याने उपस्थित राहणे बंधनकारक वाटले असेही शिवसेना नगरसेवक महेंद्र धनगर यांनी सांगितले.