Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»घरकुल लाभार्थ्यांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात
    जळगाव

    घरकुल लाभार्थ्यांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात

    Tushar BhambareBy Tushar BhambareFebruary 14, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागरिकांकडून फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा

    बोदवड – शहरातील गट नं ५७९/२ व ५८०/२ यामधील प्रभाग क्रं.१६,१७,आणि ८ मध्ये येत असलेल्या स्वामी विवेकानंद नगर,बजरंग पुरा,मण्यार वाडा येथील रहिवासी यांना घरकुल लाभ घेण्यासाठी मोजणी सीट किंवा सीटी सर्वेचा उतारा आवश्यक असल्याने व त्यांना तो मिळत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून येथील लाभार्थी घरकुल लाभाच्या प्रतिक्षेत होते.

    अखेर आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून व येथील रहिवासी शांताराम रामकृष्ण कोळी यांच्या समवेत असलेल्या ४४४ अर्जदाराच्या पाठपुराव्याला यश आले भुमी अभिलेख कार्यालयाकडून शहरातील स्वामी विवेकानंद नगर,बजरंग पुरा,मण्यार वाडा येथील ३६ घरकुल लाभार्थ्यांच्या घरांच्या जागेच्या मोजणीला सुरुवात झाली आहे.

    नगर पंचायत माध्यमातून घरकुल लाभ व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्या करीता संबंधित कागदपत्रांनी कायम आवश्यकता भासत असते.त्यामुळे ही आवश्यक कागदपत्रे संबंधित रहिवासी यांच्याकडे नसल्याने गेल्या दिड वर्षांपासून ते घरकुल लाभ व इतर शासकीय योजनांपासून वंचित होते.

    याबाबत येथील शांताराम कोळी व येथील ४४४ अर्जदारांनी याबाबत वारंवार पाठपुरावा करून आंदोलन करीत संबंधित समस्या आ.पाटील यांच्याकडे मांडली.याची दखल घेत आ.पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना करीत सदरचा प्रश्न मार्गी लावला.

    गेल्या दिड वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लावल्याबद्दल आ.पाटील याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif