धुळे । संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल आज दि.७ रोजी जिल्हा न्यायालयात लागण्याची शक्यता आहे. यापूर्वीही धुळे कोर्टात 21 मे रोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार होती.मात्र, काही संशयित आरोपी गैरहजर असल्यामुळे न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जूनला ठेवली आहे. त्यामुळे आज निकाल लागण्याची शक्यता असून निकाल काय लागतो? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जळगाव घरकुल खटलाचे कामकाज न्या.सृष्टी निळकंठ यांच्या न्यायालयात सुरु आहे. या खटल्यात 48 संशयित असून त्यात माजीमंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, जगन्नाथ वाणी, प्रदीप रायसोनी, राजेंद्र मयूर, तत्कालीन मुख्याधिकारी पी.डी.काळे, विजय कोल्हे, आ.चंद्रकांत सोनवणे, राम जाधव, पुष्पा पाटील, पटवे, अजय जाधव यांचा समावेश आहे. या निकालामुळे जळगाव जिल्ह्यातील भविष्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड.प्रवीण चव्हाण, तर आरोपींतर्फे अॅड.अविनाश भिडे, अॅड.राजाभाऊ ठाकरे, अॅड.प्रकाश पाटील, अॅड.अकील इस्माईल, अॅड.सी.डी.सोनार, अॅड.एस.आर.वाणी, अॅड.जितेंद्र निळे हे कामकाज पाहत आहेत.