घनकचरा व्यवस्थापन सेवाशुल्क मागे घ्यावे : कॉंग्रेस कमिटी मागणी

0

जळगाव :- शहरातील नागरिकांना कोणत्याही सेवासुविधा न देता घनकचरा व्यवस्थापन सेवाशुल्काच्या नावाने लागू केलेली करवाढ मागे घेण्याची मागणी जळगाव शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्याकडे केली आहे.

एकीकडे घनकचरा प्रकल्प कार्यान्वीत नसताना दुसरीकडे कराची वसुली करणे कितपत योग्य आहे? अशी विचारणा कॉंग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरींनी केली. शहरवासीयांना महापालिका कराच्या बदल्यात रस्ते, साफसफाई, नियमित पाणीपुरवठा आदी मुलभूत सुविधा देत नाही. या सर्व मुलभूत सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी असून नव्याने घनकचरा व्यवस्थापन सेवा शुल्क लावणे योग्य नाही. घनकचरा प्रकल्प कार्यान्वीत होईपर्यंत नव्याने सेवाशुल्क आकारु नये, आकारलेला सेवा शुल्क तातडीने मागे घ्यावा. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी निवेदनाव्दारे दिला. नदीम काझी, फैसल शेख, ज्ञानेश्वर कोळी, जगदीश गाढे, दीपक बाविस्कर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.