जळगाव – शहरातील दैनंदिन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा प्रकल्पासाठी शासनाकडून ३० कोटी ७५ लाखाचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी ८ कोटी ९६ लाखाचा निधी महापालिकेला मिळाला आहे.
शहरातील दैनंदिन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेने हंजीर बायोटेक कंपनीला कराराने घनकचरा प्रकल्प दिला होता. परंतु या कंपनीने सहा वर्षांपूर्वी अचानक प्रकल्प बंद करून काढता पाय घेतला. महापालिकेने मागील वर्षी घनकचरा प्रकल्प ताब्यात घेऊन नवीन घनकचरा प्रकल्पासाठी 30 कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार केला होता. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी ८ कोटी ९६ लाखाचा निधी महापालिकेला मिळाला आहे. वर्षभरात वाहन खरेदी व १२ कोटींची निविदा काढण्याचे काम झाले आहे. हा घनकचरा प्रकल्प तीन ठिकाणी व्यवस्थापन करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर जुन्या घनकचरा प्रकल्पावरील साचलेल्या कचऱ्याचे बॉयो मायनिंग करण्याचे लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
दरम्यान पालिकेचा जुना घनकचरा प्रकल्प हा आव्हाने शिवारात तो बंद आहे. परंतु या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी लाखोटन कचरा प्रक्रिया न होता तसाच पडून आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.