घणसोलीत पहिले आयुर्वेद शिबीर यशस्वीरीत्या संपन्न

0

मुंबई – घणसोलीतील सेक्टर ४ मध्ये नुकत्याच झालेल्या आयुर्वेद शिबिरास घणसोलीतील अनेक नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.संत राजिंदर सिंग यांच्या मार्गर्दर्शनांतर्गत भरविण्यात येणाऱ्या या आयुर्वेद शिबिरातील यंदाचे हे २७ वे रक्तदान शिबीर असून २३ वे नेत्र शिबीर भरविण्यात आले होते.

त्यात अनुक्रमे १२६ नागरिकांची रक्तदान शिबिरात सहभाग घेत १०३ नागरिकांनी स्वइच्छेने रक्तदान केले तर २३ नागरिक रक्तदान करण्यास अपात्र ठरले. त्याचबरोबर ६५९ नागरिकांनी नेत्र शिबिरात चिकित्सा करून घेत त्यातील ७१ रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले. तसेच ३८४ नागरिकांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. आयुर्वेद शिबिरातील डॉक्टरांनी रुग्णांची सूक्ष्म तपासणी करत रुग्णांना लवकरच रिपोर्ट देण्यात येतील.  संत राजिंदर सिंग यांच्या समाजकार्यात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे संस्थेतर्फे आभार मानण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.