Friday, August 12, 2022

ग.स. सोसायटीसह जिल्हयातील सर्व शिक्षक सोसायटींच्या निवडणुका “महाविकास पॅनल” लढविणार

- Advertisement -

पाचोरा –  दि. ४  रोजी पद्मालय विश्रामगृह, जळगांव येथे शिक्षक सेनेच्या प्राथमिक, माध्यमिक, म.न.पा., उर्दू, महाविदयालयीन, आश्रमशाळा, आरोग्य विभाग इ. अंगीकृत शाखांच्या झालेल्या सहविचार सभेत ग.स.सोसायटी, माध्यमिक शिक्षक सोसायटी, पारोळा पश्चिम शिक्षक सोसायटी, भुसावळ शिक्षक सोसायटी इ. सहकारी संस्थाच्या आगामी होणाऱ्या निवडणूका लढविण्यासाठी सर्वानुमते सर्वसमावेशक अशा “महाविकास पॅनल” ची स्थापना करण्यात आली.

- Advertisement -

मुक्ताईनगरचे नवनिर्वाचित आमदार चंदकांत पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वरभाऊ सपकाळे अध्यक्षस्थानी होते. या सहविचार सभेत सरचिटणीस – राधेशाम पाटील यांनी डी.सी.पी.एस. तसेच इतर समविचारी संघटना तसेच सक्षम इच्छुक उमेदवार यांनादेखील सोबत घेण्यात येईल असे सांगितले. जिल्हा प्रसिद्धीप्रमुख – संदिप पवार यांनी महाविकास या स्वतंत्र पॅनेल स्थापनेची आवश्यकता, पॅनेलचा हेतु व ध्येयधोरणे याविषयी माहिती विषद केली. कार्याध्यक्ष – राजेश जाधव यांनी लवकरच तालुकानिहाय बैठका घेण्यात येतील असे सांगितले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष – नाना पाटील यांनी केले. याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख – उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याबददल तसेच शिवसेना उपनेते –  गुलाबराव पाटील हे कॅबिनेटमंत्री झाल्याबद्दल तसेच जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या वर्षापासुन शिक्षण तपस्वी पुरस्कार जिल्हयातील उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना लवकरच शिक्षकसेनेच्या वतीने देण्यात येतील. अशी माहिती देण्यात आली.

- Advertisement -

- Advertisement -

याप्रसंगी महाविदयालयीन कर्मचारी सेनेचे राज्याध्यक्ष -अतुल शेटे, माध्यमिक शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक – नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष – वासुदेव चौधरी, भडगांव तालूकाध्यक्ष – टिकारामसिंग पाटील, अमळनेर तालूकाध्यक्ष – मधुकर चौधरी, सिद्धार्थ बागूल, महेंद्रसिंग पाटील चाळीसगांव, राजेंद्र पाटील पाचोरा, जळगांव तालूकाध्यक्ष – नरेंद्र सपकाळे, धरणगांव तालूकाध्यक्ष –  रमेश बोरसे, यावल तालूकाध्यक्ष – संदीप पाटील, एरंडोल तालूकाध्यक्ष – सचिन सरकटे, चोपडा तालूकाध्यक्ष – चंद्रशेखर साळुंखे, निळकंठ चौधरी (जळगाव), निलेश पाटील (पारोळा), वसंत खैरे (चाळीसगांव), जळगांव म.न.पा. पदाधिकारी – सय्यद हाफीजअली, माध्यमिक शिक्षकसेना कार्याध्यक्ष – गोविंदा पाटीलष अमळनेर माध्यमिक तालूकाध्यक्ष – संदीप बोरसे, बोदवड माध्यमिक तालूकाध्यक्ष – संदीप तायडे, मुकताईनगर तालूकाध्यक्ष – राकेश साळुंखे, सतीश महाजन (एरंडोल), प्रदीप हिरोळे (बोदवड), राजेंद्र पाटील (पाचोरा), किशोर पाटील (जळगाव), गजानन वाल्हे , बापूराव चव्हाण (अमळनेर), जगदिश जाधव (चोपडा), पुरुषोत्तम माळी (अमळनेर), घनशाम पाटील (धरणगांव) यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या