ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोज पाटील तर उपाध्यक्षपदी शामकांत भदाणे

0

जळगाव । सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी आज मनोज पाटील तर उपाध्यक्षपदी शामकांत भदाणे यांची निवड करण्यात आली. या निवडीसाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.  यात अध्यक्षपदासाठी मनोज पाटील तर उपाध्यक्षपदासाठी शामकांत भदाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

ग. स. सोसायटीचे अध्यक्ष विलास नेरकर व उपाध्यक्ष के. पी. चव्हाण यांनी मार्च महिन्यात राजीनामा दिल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. तब्बल दोन महिन्यानंतर ग. स. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यात अध्यक्षपदी आज मनोज पाटील तर उपाध्यक्षपदी शामकांत भदाणे यांची निवड करण्यात आली. आपण सर्व संचालकांना सोबत घेऊन आणि ग.स. च्या सर्व सदस्यांच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही नूतन अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली. तर शामकांत भदाणे यांनी सोसायटीची उज्ज्वल परंपरा कायम राखण्यासाठी सर्व संचालक आणि सभासदांच्या मदतीने प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.