ग.स.सोसायटीचे सूर्यवंशी व पाटील यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

0

जळगाव : ५० लाखाच्या गैरव्यवहारप्रकरणी ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील सूर्यवंशी आणि विभागीय अधिकारी किरण पाटील यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांना आज गुरूवारी दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर केले करण्यात आले होते.

ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील सूर्यवंशी आणि किरण पाटील यांना न्यायालयात हजर केले. कामकाजाचा तपासाधिकारी म्हणून ला.प्र.वि.चे पोलीस उपअधिक्षक जी.एम. ठाकूर यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागीतली होती. यावर न्यायालयाने दोघा संशयितांना सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कामकाजात संशयित आरोपी सुनील सूर्यवंशीतर्फे ॲड. साखर चित्रे तर दुसरे संशयित आरोपी किरण अभिमन पाटील यांच्यातर्फे ॲड. प्रकाश पाटील तर सरकारच्या वतीने सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके हे काम पाहत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.