ग.स.पतपेढी निवडणुकीत शिक्षक भारती संघटनेची भूमिका निर्णायक ठरणार

0

जिल्ह्यात शिक्षक आमदार कपिल पाटील यांना मानणारा मोठा वर्ग

अमळनेर(प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचे सावट हळू हळू ओसरतांना दिसत असून आता मागील काही काळापासून कोरोनामुळे रखडलेल्या सहकार क्षेत्राच्या निवडणुकांच बिगुल वाजायला सुरवात झालेली आहे.

जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वात जास्त उलाढाल असलेल्या काही संस्थांमध्ये गणली जात असलेली जळगाव जिल्हा सरकारी कर्मचारी पतपेढी म्हणजेच ग.स. पतपेढीची निवडणूक काही दिवसांमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे.
या पतपेढीत वस्तीशाळा,प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांची तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.हा वर्ग मोठ्या प्रमाणात शिक्षक आमदार कपिल पाटील यांना मानणारा आहे.
शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून कपिल पाटील यांनी राज्यभरातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रश्नांना विधानभवनात वेळोवेळी वाचा फोडलेली आहे तसेच विविध आंदोलनाच्या माध्यमातुन शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना न जुमानता हिरीरीने सहभाग नोंदवला आहे.

जळगाव जिल्ह्यात देखील संघटनेने मागील काही काळात मोठी ताकत उभी केलेली आहे.राज्यात सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ योजनेचा शुभारंभ सर्वात आधी जळगांव जिल्ह्यात करण्यात आला आहे.कोरोना काळात जिवाची पर्वा न करता जिल्ह्यातून स्वास्थ्य योजनेची राबवण्यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.आज मितिस ९५४ सभासदांची नोंदणी झालेली आहे.
शिक्षक आमदार कपिल पाटील ज्या हातोटीने व सचोटीने शिक्षक,शिक्षककेतरांचे प्रश्न लावून धरून तडीस नेतात अगदी त्याच प्रमाणे माध्यमिक चे जिल्हाध्यक्ष नारायण आनंदा वाघ व प्राथमिक चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ ब्रिजलाल पाटील आणि जिल्ह्यतील सर्व पदाधिकारी हे देखील तितक्याच तत्परतेने जिल्ह्यातील शिक्षकांचे तथा शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रभागी असतात. आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका कार्यकारणी उभी करून संघटनेची ध्येय धोरणे प्रत्येक शाळेपर्यंत पोहचवण्यासाठी मेहनत घेतलेली आहे.
म्हणून येणाऱ्या ग.स.पतपेढीच्या निवडणुकीत शिक्षक भारती संघटनेला मानणारा वर्ग कोणाच्या बाजूने झुकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ग.स.सोसायटीतील विद्यमान संचालक मंडळ एकहाती सत्ता घेवून निवडून आले होते.जामीनकी व विशेष कर्जावरील व्याज कपात तसेच डीसीपीएस बांधवांसाठी काही योजनेचा निर्णय घ्यायला हवा होता.उलटपक्षी संचालक मंडळाने कोट्यावधीचे संगणक खरेदी करणे,सभासदांचे सभासदत्व रद्द करणे यांसारखे निर्णय मागील काळात घेतले. ग.स.सभासद वर्ग हा बुध्दीजिवी, सुज्ञ आणि जागृत आहे.येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत पतपेढीच्या व सभासदांच्या हितासाठी शिक्षक भारती संघटना कार्य करेल.
नारायण आनंदा वाघ
जिल्हाध्यक्ष:-माध्यमिक शिक्षक भारती संघटना,जळगांव

ग.स.पतपेढीच्या निवडणुकीत शिक्षक भारती संघटना संपूर्ण ताकदीने उतरणार आहे.पुढील काळात सभासदांच्या हितासाठी कोविड सारख्या उद्भवणाऱ्या आजारांसाठी आरोग्यदायी योजना,कमी व्याजदरात कर्ज वाटप करणे,अनावश्यक खर्च उधळपट्टी टाळणे, विविध महत्त्वपूर्ण योजना राबवून सभासद हिताचे निर्णय घेणे.सभासदांना मृत्यूनंतर संपूर्ण कर्जमाफी करून त्यांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत देणे, यासारख्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

सोमनाथ ब्रिजलाल पाटील

जिल्हाध्यक्ष:- प्राथमिक शिक्षक भारती संघटना जळगाव)

Leave A Reply

Your email address will not be published.