पारोळा (प्रतिनिधी) येथील पेंढारपुरा भागातील रहिवासी ग.भा मंजुळाबाई त्र्यंबक सोनवणे (80) यांचे दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता पेंढारपूरा पारोळा येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या राजेंद्र, रवींद्र, गणेश सोनवणे यांच्या मातोश्री होत.