जळगाव (प्रतिनिधी )-
महाशिवरात्री निमित्त जळगाव येथील जय नगर भागातील ओंकारेश्वर मंदिरात शुक्रवार दिनांक 21 फेब्रूवारी रोजी सकाळपासुन ग्लोबल फौंडेशनतर्फे शिवभक्तांना राजगिरा लाड़ूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविन्यात आला असून सुमारे 10 हजार राजगीरा लाड़ूचे वाटप शिव भक्तांना करण्यात आले असून या पुढेही फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक सेवाभावी उपक्रम घेण्यात येणार असल्याचे यावेळी अध्यक्षा सौ .श्रद्धा नेवे यांनी सांगितले . यावेळी अबालवृद्ध शिवभक्त भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
. यावेळी ग्लोबल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ .श्रद्धा नेवे ,उपाध्यक्ष गिरीश नेवे, वैभव नेवे, नवीन दलाल, सौं रुपाली नेवे, शेखर तायडे यांनी परीश्रम घेतले. धीरज दलाल, विजय दलाल, विलास नेवे, राहुल अमृतकर (योगेश ट्रॅव्हल्स ) यांचे विशेष सहकार्य लाभले .