अमळनेर- महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ तर्फे “धुळे” येथे जून 2019 मध्ये “ग्रेटर खानदेश अधिवेशन” घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगांव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील संघटनाची समन्वय बैठक आज दि.०६ मे रोजी सकाळी 10 वाजता जी एस हायस्कुल मध्ये होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील अध्यक्षस्थानी राहतील. “धुळे ” येथे पुढील महिन्यात घेण्यात येणाऱ्या “ग्रेटर खानदेश” अधिवेशनाबाबत व शिक्षण क्षेत्रातील समस्या व धोरणावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला शिक्षणसंस्थाचालक, मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर संघटनाच्या प्रतिनिधीनी उपस्थित रहावे असे आवाहन राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे करण्यात आले आहे.