ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे सन- २०२० राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा निकाल जाहीर

0

भातखंडे (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार, राष्ट्रपिता महात्मा गांधी  यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील  नागरिकांची वैचारिक प्रगल्भता वाढावी याकरीता ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व मा.श्री. बाळासाहेब कोळपे युवा मंच  यांच्या  वतीने  खुल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यांचा निकाल विजयादशमीच्या सनाचे औचित्य साधत जाहीर करण्यात आला असून संचारबंदीच्या अनुषंगाने विजेत्या स्पर्धकांना ऑनलाईन  बक्षीस पोहच करण्यात येणार तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र  देण्यात येणार आहे अशी माहिती ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सचिव  प्रितम रामचंद्र पाटील  यांनी दिली.

 

ऑनलाइन  निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण महाराष्ट्रातून या  स्पर्धेत प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला   स्पर्धेत तब्बल २३६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता . स्पर्धकांनी आपले कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केला या स्पर्धेचा निकाल स्पर्धेचे परीक्षक प्रा.विजयकुमार रामदास घोडके. मराठी विभाग एस. जी. के.कॉलेज लोणी काळभोर पुणे. प्रा. बाळासाहेब जगताप यांच्या  परीक्षणातून जाहीर करण्यात आला.

ऑनलाईन निबंध  स्पर्धेत २३६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये

प्रथम क्रमांक – गौरवी शिवराम गवस. ता.चिपळूण जि.रत्नागिरी ( विषय- कोरोणा एक अनुभव ) पारितोषिक- प्रमाणपत्र /स्मृतीचिन्ह / १५०१ रूपये.

सौजन्य-  बाळासाहेब कोळपे (साधना सहकारी बॅक माजी व्हा. चेअरमन)

 

द्वितीय क्रमांक- .किशोर अरविंद वालावलकर . सातववाडी जि.सिंधुदुर्ग  ( विषय- स्त्री भ्रुण हत्या ) पारितोषिक- प्रमाणपत्र /स्मृतीचिन्ह/  १००१ रूपये.

सौजन्य- बाळासाहेब कोळपे (साधना सहकारी बॅक माजी व्हा. चेअरमन)

 

तृतीय क्रमांक- प्रतिक्षा बाळासाहेब कोळपे.  ता.हवेली जि .पुणे ( विषय- पर्यावरण संवर्धन काळाची गरज ) पारितोषिक- प्रमाणपत्र /स्मृतीचिन्ह/  ७०१ रूपये.

सौजन्य-  बाळासाहेब कोळपे (साधना सहकारी बॅक माजी व्हा. चेअरमन)

 

उत्तेजणार्थ क्रमांक- १)सौ.मेघना किशोर अहिरे ,२)पल्लवी मोरेश्वर चोपकर ,३)सोहम राजाराम गुरव,४) सौ. स्मिता सुधीर माळवदे

पारितोषिक- प्रमाणपत्र /स्मृतीचिन्ह/ ५०१ रूपये.

सौजन्य-  बाळासाहेब कोळपे (साधना सहकारी बॅक माजी व्हा. चेअरमन)

 

मराठी मातीशी नाळ जोडलेल्या कवी, लेखक ,साहित्यिक, रसिकांमध्ये वाचन आणि लेखनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमच कोरोणा काळात ऑनलाईन स्पर्धेला  संपुर्ण महाराष्ट्रातुन  चांगला प्रतिसाद मिळाला आहे असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.