ग्रीन फाउंडेशन पाचोरा तालुका अध्यक्ष भुपेंन्द्र बेलदार यांनी केले अभिनंदन

0

भातखंडे (प्रतिनिधी) : कोरोना काळात डॉक्टर,पोलीस, सफाई कर्मचारी, पत्रकार,यांनी आपले कर्तव्य पुर्णपणे पार पाडले व आता ही कर्तव्य बजावत आहेत. या काळात उत्कृष्ट कार्याबद्दल ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अमित जगताप यांनी कोरोना योध्दांचा सत्कार करूण त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.

दसरा विजयादशमी या सणाचे औचित्य साधून ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चा वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यां पत्रकारांना प्रदान करण्यात आले आहे.यात पाचोऱ्यातील शेख जावीद न्युज एटींन पत्रकार,श्री बी एन पाटील दै.देशदूत पत्रकार, कुंदन बेलदार महाराष्ट्र माझा न्युज कार्यकारी संपादक,यांचा समावेश आहे.सर्वांचे अभिनंदन ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे पाचोरा तालुका अध्यक्ष भुपेंन्द्र बेलदार यांनी केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.