Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»ग्रा.पं.निवडणूकीसाठी मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
    जळगाव

    ग्रा.पं.निवडणूकीसाठी मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

    By January 14, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांचेकडील 11 डिसेंबर, 2020 रोजीच्या पत्रान्वये जळगाव जिल्ह्यातील माहे एप्रिल ते डिसेंबर, 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 783 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला असून यासाठी 15 जानेवारी, 2021 रोजी मतदान होणार आहे.

    महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णयानुसार दिनांक 15 व 20 जानेवारी, 2021 रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

    जळगाव जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहेत त्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रांमध्ये मतदारांना मतदान करणे सोईचे व्हावे यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील (उदा. खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्ये गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान व कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी, अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी  ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव अथवा उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासाची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

    उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातंर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी व्यवस्थापनाने या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदाराकडून मतदानाकरीता सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif