मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी धनंजय सापधरे
भुसावळ (प्रतिनिधी )- ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या तालुकाध्यक्षपदी येथील पत्रकार उज्वला बागुल यांची नुकतीच एकमताने नियुक्ती करण्यात आली . जिल्हाअध्यक्ष हेमंत भांडारकर (अमळनेर ) व महाराष्ट्र शासन अशासकीय सदस्य विकास महाजन (पारोळा ) सर, राज्य समन्वयक राजेश सैनी यांनी नुकतीच रविवार 29 रोजी भुसावळ येथील कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी सदस्यांची बैठक संपन्न झाली . या बैठकीत तालुका अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली .यामध्ये भुसावळ तालुका अध्यक्ष पदी पत्रकार उज्वला बागुल यांची तर मुक्ताईनगर तालुक्याचे अध्यक्षपदी धनंजय सापधरे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रसंगी जिल्हा अध्यक्षांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येवून सन्मानित करण्यात आले .
यावेळी नुकत्याच जिल्हा सचिव म्हणून नियुक्त झालेल्या ॲड जास्वंदी भंडारी व तालुकाध्यक्ष उज्वला बागुल यांनी जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर व महाराष्ट्र शासन अशासकीय सदस्य विकास महाजन सर यांचे स्वागत केले . यावेळी तालुकाउपाध्यक्ष हर्षल गोराडकर, अँड. निलेश भंडारी , नरेश साळी (अमळनेर ), उत्कर्ष भंडारी , तळेले, यांचेसह सदस्य उपस्थित होते .
या नियुक्तिबद्दल ॲड जास्वंदी भंडारी व उज्वला बागुल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .