Wednesday, August 17, 2022

ग्राहकांना मोठा झटका; टेलिकॉम कंपन्यांच्या ‘या’ प्लान्समध्ये मोठा बदल

- Advertisement -

नवी दिल्ली : भारतात आता ग्राहकांना स्वस्त प्रीपेड प्लान्समध्ये एसएमएसचा फायदा मिळणार नाही. जिओ, एअरटेल आणि वीआय या टेलिकॉम कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.  एक काळ होता जेव्हा लोक अतिरिक्त एसएमएससाठी वेगळा रिचार्ज करत होते. परंतु हल्ली व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम  आणि इतर अनेक इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्समुळे लोक एसएमएस अ‍ॅप फक्त ओटीपी बघण्यासाठी वापरत आहेत. आता टेलिकॉम कंपन्या देखील एसएमएसचा वापर अजून कमी होण्याच्या दिशेने पाऊले टाकत आहेत.

- Advertisement -

भारतातील टेलिकॉम दिग्गज कंपन्या एयरटेल, वोडाफोन-आयडिया आणि रिलायन्स जियो आपल्या 100 पेक्षा कमी किंमतीच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये मोफत SMS देत नाहीत. म्हणजे या तिन्ही कंपन्या आपल्या एंट्री लेव्हल स्वस्त प्लॅन्समध्ये तुम्हाला इतर प्रीपेड प्लॅन्स प्रमाणे मोफत एसएमएस देत नाहीत.

- Advertisement -

- Advertisement -

प्रत्येक युजर मागील सरासरी उत्पन्न  वाढवण्यासाठी कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा आहे. ज्या लोकांना मोफत एसएमएस बेनिफिट्स हवे असतील असे ग्राहक 100 पेक्षा जास्त किंमतीचे रिचार्ज पॅक वापरतील आणि कंपन्यांचे उत्पन्न वाढेल. टेलीकॉम कंपन्यांच्या या निर्णयानंतर एंट्री लेव्हल पॅक वापरणाऱ्या ग्राहकांना धक्का बसला आहे. मोफत एसएमएस न मिळाल्यामुळे युपीआय व्हेरिफिकेशन, मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी अश्या अनेक सुविधांच्या फक्त एका मेसेजसाठी ग्राहकांना जास्त खर्च करावा लागले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या