मुंबई : देशात करोना झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. याचा परिणाम इंधनाच्या मागणीवर होण्याची शक्यता आहे. तूर्त कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. आज मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल दराल कोणताही बदल केला नाही. सलग पाचव्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
आज मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे.
कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे.