मुक्ताईनगर, प्रतिनिधी –
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून ग्रामपातळीवर तयार करण्यात आलेल्या समित्यांचे मूल्यमापन करण्यासाठी तालुका व विधानसभा क्षेत्र स्तरावर मूल्यमापन समित्या गठित करण्यात येत असून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपातळीवरील समित्यांची निवड करून त्या गावांच्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून विशेष विकास कामांसाठी निधी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली विशेष म्हणजे असा प्रयोग महाराष्ट्र राज्य स्तरावरील एकमेव प्रयोग असून या प्रयोगांमध्ये मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर बोदवड व रावेर या तीनही तालुक्यातील मतदारसंघातील गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच अवैधरीत्या दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची देखील त्यांनी मागणी केली.
महाराष्ट्रात कोरोना संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशन काळातील सुट्टीच्या वेळी मुक्ताईनगर येथे जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा रुग्णालयातील प्रतिनिधी, मुक्ताईनगर चे तहसीलदार, गटविकास अधिकारी ,पोलीस निरीक्षक यांच्यासमवेत तातडीने आढावा बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते व राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरलेला तालुकास्तरावरील पहिलाच प्रयोग ठरला होता. त्याच धर्तीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार पत्रकार परिषद घेऊन मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण स्तरावरील असलेल्या कोरोनाशी लढणाऱ्या ग्राम समित्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मूल्यमापन समिती निर्माण करण्याचे ठरवून या मूल्यमापन समिती द्वारे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एनजीओ, स्वयंसेवी संस्था, अधिकारी, कर्मचारी, यांचा गौरवकरण्यात येईल. व ज्या गावाचे समितीचे कार्य उत्कृष्ट असेल त्या गावाला आमदार निधीतून विशेष बाब म्हणून विकासकामांसाठी निधी देण्याची घोषणा केली. राज्यातील हा देखील पहिलाच प्रयोग केला असून आमदार पाटील यांच्या या घोषणे बद्दल मतदारसंघातून कौतुक केले जात आहे.
तसेच मुक्ताईनगर शहरासह टाकळी ,इच्छापुर ,सारोळा, माळेगाव,सातोड , हरताळे ,कोथळी , मानेगाव, उचंदा,कुऱ्हा ,अंतुर्ली, यासह काही गावांमध्ये अवैधरित्या खुलेआम दारू विक्री केली जात आहे त्यात देशी दारू गावठी दारू व इंग्लिश दारू चा देखील समावेश असून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्स सिंगचा फज्जा उडत आहे. }पत्रकार परिषदेतच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून त्यांनी तक्रार देखील केली.तालुक्यात यापूर्वी एल सी बी ने दारू विक्रेत्यांवर थातूरमातूर कारवाई केल्याचे देखील त्यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.