धान्य मिळत नसल्याची तक्रार ; जि प सदस्या पल्लवी सावकारेंच्या मध्यस्थिने गावक-यांना तहसीलदारांचे आश्वासन
भुसावळ:- पिवळे व केशरी शिधापत्रिका धारकांना गेल्या दोन तीन महिन्यांपासून रेशनदुकांदार धान्य देत नसल्याने तसेच रेशनदुकांनदार धान्य पुरवठा योग्य रितीने करीत नाही याउलट शासनाच्या ऑनलाईन प्रक्रियेबद्दलची तीव्र नाराजी व्यक्त करीतसंतप्त झालेल्या तालुक्यातील कु-हा पानाचे येथील गावकरी व महिलांनी भुसावळ तहसील कार्यालयावर आपला मोर्चा आणीत जि प अध्यक्षा पल्लवी सावकारे यांच्या पुढाकाराने प्रशासनाला जाब विचारला .दिनांक 30 मे रोजी दुपारी भुसावळात तहसील कार्यालयात यां सर्वांनी आपल्या व्यथा मांडल्या.
वारंवार आधारकार्ड लिंक प्रक्रिया यासह ऑनलाइन प्रक्रियेकरिता लागणा-या सर्व अटी व नियमानुसार रेशनदुकानदारांना सर्व कागदोपत्राची पूर्तता करून देखील गेल्या 2/ 3 महिन्यांपासून शिधपत्रिकेवर मिळणारे गहू तांदूळ तूरडाळ ,ज्वारी हे धान्य दुकानदार देत नाही . ऑनलाइन प्रक्रियेमुळे अनेकांचे अंगठे मॅच होत नाही तर काहींचे आधार लिंक नसल्याने देता येत नाही अशी एक ना अनेक कारणे दुकानदार सांगतात एवढेच नाही तर 100 रुपये चार्ज ऑनलाइन करिता मागत असल्याची तक्रार या समस्त गावक-यांनी केली आहे . दरम्यान तहसील येथे येण्या आधी या नागरिकांनी जि प सदस्या सौ पल्लवी सावकारे यांच्याकडे जाऊन सर्व व्यथा सांगितली . पल्लवी सावकारे यांनी पुढाकार घेऊन या गावक-यांना न्याय देण्याकरिता स्वतः तहसील येथे आल्या व तहसीलदार यांना ठणकावून जाब विचारला .यावेळी तहसीलदार पवार यांनी जून महिन्यापासून सर्वाना रीतसर व योग्य धान्य मिळेल असे आश्वासन दिल्याने संतप्त गावकरी माघारी परतले .